भारताकडे अध्यक्षता आल्यानंतर जी 20 देशांच्या राजदूतांचा पहिलाच भारत दौरा अंदमानात; सावरकर कोठडीत श्रद्धांजली


वृत्तसंस्था

पोर्ट ब्लेअर : विकसित आणि विकसनशील देशांची संघटना ग्रुप 20 अर्थात जी 20 देशांचे नेतृत्व भारताकडे आल्यानंतर जी 20 देशांचे राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित भारताचा पहिला दौरा केला, तो देखील अंदमान निकोबार मध्ये. जी 20 देशांचे राजदूत आणि त्यांच्याबरोबरचे अन्य 20 अधिकारी अशा 40 जणांनी अंदमान निकोबार बेटांना भेटी दिल्या. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचवेळी त्यांनी वीर सावरकरांच्या कोठडीत जाऊन त्यांना नमन केले. सेल्युलर जेलच्या परिसराची पाहणी करून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती घेतली. Ambassador of 20 countries first visit India Andaman

जी 20 देशांची अध्यक्षता इंडोनेशियाकडून भारत आकडे आली आहे. इंडोनेशियातील बालीमध्ये नुकत्याच झालेल्या जी 20 देशांच्या शिखर संमेलनात इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-20 देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. जी 20 देशांची पुढचे शिखर संमेलन भारतात होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून जी 20 देशांचे राजदूत आणि वरिष्ठ अधिकारी यांचा भारत दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरुवात यजमान म्हणून भारताने अंदमान निकोबार पासून केली आहे. त्यातही या सर्व देशांच्या राजदूतांना प्रथम भारतीय स्वातंत्र्याचे तीर्थस्थान अंदमान निकोबारच्या सेल्युलर जेल येथे नेण्यात आले. तेथे सर्व राजदूत आणि अधिकाऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्य योद्धांना श्रद्धांजली वाहिली. सेल्युलर जेलची पाहणी करताना हे सर्वजण वीर सावरकरांच्या कोठडीत गेले. तेथे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अंदमानच्या शहीद आणि स्वराज बेटावर जाऊन तिथल्या संस्कृतीचा आणि जनतेच्या आदरातिथ्याचा आस्वाद घेतला. योगा केला.

सर्वसामान्यपणे कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा राजधानी नवी दिल्लीत होत असत. विदेशी बड्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून ताजमहाल दाखवण्यात येत असे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पायंडा बदलून चीनच्या राष्ट्राध्यक्षांची महाबली पुरम मध्ये भेट घेतली. जपानच्या पंतप्रधाना बरोबर आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर काशीमध्ये महाआरती केली. आणि आता जी 20 देशाची अध्यक्षता भारताकडे आल्यानंतर त्या देशांच्या राजदूतांचा पहिला दौरा अंदमान निकोबार बेटांचा ठेवला. त्यांना सेल्युलर जेलमध्ये जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याची कल्पना दिली. सावरकर कोठडीत नेऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नायकाचे दर्शन घडविले. हे यातले वेगळे वैशिष्ट्य ठरले.

Ambassador of 20 countries first visit India Andaman

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण