विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील मुस्लिमांनी एकत्र येऊन इस्लामवर होत असलेल्या हल्ल्यांवर बौद्धिक, तार्किक, प्रसारमाध्यमांद्वारे किंवा रस्त्यावर उतरून सशस्त्र प्रतिहल्ला करावा, असे आवाहन अल कायदाचा प्रमुख अयमान जवाहिरी याने केला आहे. जय श्रीरामच्या घोषणेला विरोध म्हणून अल्ला हू अकबरचा नारा देणाºया मुस्कान या भारतीय तरुणीचे त्याने कौतुक केले आहे.Al Qaeda’s Ayman al-Zawahiri praises Muskan Khan, appeal Muslims to carry out armed counter-attacks
अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अस-सहाब मीडिया या मुखपत्राद्वारे जवाहिरीची नऊ मिनिटांची चित्रफीत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये हिजाबप्रश्नावरील वादावर तेथील मुस्लिम विद्यार्थिनी मुस्कान खान हिने हिंदू आंदोलकांनी घेरले असतानाही अल्ला हु अकबर असे नार दिले होते. तिचे जवाहिरीने या चित्रफितीत कौतुक केले आहे.
तो म्हणाला, आपल्या नाºयांद्वारे हिंदू बहुईश्वरवाद्यांच्या टोळीला तिने उघड आव्हान दिले. तिच्या या कृत्याने मुस्लिम समाज पुन्हा जागृत झाला असून, जिहाद (धर्मयुद्ध) अधिक प्रबळ झाला आहे. जवाहिरीने या चित्रफितीत सांगितले, की भारतातील हिंदू लोकशाहीच्या मृगजळाला मुस्लिमांनी भुलू नये. इस्लामला दाबून टाकण्याचे ते एक अस्त्र आहे.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या वास्तव जगात मानवी हक्क किंवा संविधानाचा आदर किंवा कायदा अशा निर्थक मूर्ख कल्पनांना स्थानच नाही. पाश्चिमात्य जगाने मुस्लिमांविरुद्ध केलेला फसवणुकीचा कट असून, तो आता भारतात आला आहे. फ्रान्स, हॉलंड आणि स्वित्झर्लंंड या देशांनी एकीकडे नग्नतेला मुभा देताना हिजाबला बंदी घातली आहे, हे याचे धडधडीत उदाहरण आहे. इस्लामचे हे सर्व शत्रू एकच आहेत.
मात्र, जवाहिरीने मुस्कानचे केलेले कौतुक चुकीचे असल्याचे तिच्या वडीलांनी म्हटले आहे. ते म्हणाले, हे विधान अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. आम्ही भारतात आनंदात आणि शांततेत राहत असून आम्हाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. जवाहिरी कोण आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नसून आज टीव्हीवर चित्रफितीद्वारे प्रथमच त्याला पाहिले. आम्ही भारतात बंधुत्वाच्या आणि प्रेमाच्या नात्याने राहत या चित्रफितीद्वारे आमच्यात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मोहम्मद हुसेन खान यांनी सांगितले.
जवाहिरीच्या या चित्रफितीची भारतीय सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे. जवाहिरी भारतातील या एकाच मुद्दय़ावर दीर्घ काळ बोलला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अल कायदा ही दहशतवादी संघटना आपल्या सदस्य भरतीसाठी भारताला अनुकूल प्रदेश मानतो. भारतातील असंतुष्ट मुस्लिमांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीला प्रेरणा देऊन हिंसक कृत्यासाठी त्यांना प्रोत्साहित करेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App