विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी नाराजांची फौज तर गोळा केली पण नव्याने बनलेल्या या मित्रांनीच त्यांची डोकेदुखी वाढविली आहे. जागावाटपाचा फैैसलाच होत नसल्याने तिकिटवाटप रखडले आहे.Akhilesh Yadav’s headache was increased only by his friends
भाजपचे एक मंत्री आणि नऊ आमदार भाजपची साथ सोडून समाजवदी पार्टीत आले आहेत. यामुळे अखिलेश यादव यांचीच अडचण अधिक वाढल्याचे दिसते. यापूर्वीच 6 पक्षांशी समाजवादी पक्षाची आघाडी झालेली आहे. त्यामुळे सपाला अनेक जागांवर आपल्या उमेदवारांना बसवावे लागले आहे.
आता पुन्हा नव्याने बाहेरून आलेल्या नेत्यांना जागा सोडाव्या लागणार आहेत. सर्वांना जागा वाटून ३२५ जागांवर उमेदवार उतरवण्याची अखिलेश यांची इच्छा आहे.सपाने ओमप्रकाश राजभर यांच्या सुभाएसपीसोबत, संजय चौहान यांच्या डेमोक्रॅटिक पाटीर्सोबत, अपना दलसोबत (कृष्णा पटेल गट), केशवदेव मौर्य यांच्या महान दलसोबत, जयंत चौधरी यांच्या रालोदसोबत आणि शिवपाल यादव यांच्याशी आघाडी केली आहे.
नवे नेते सपात सामील झाल्याने, अखिलेश यांना जुन्या सहकाऱ्यांसोबतच्या जागावाटपाचा पुनर्विचार करावा लागत आहे.पहिल्या टप्प्यासाठी 58 जागांवर उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले असतानाही, सपाला त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करता आलेली नाही. आता स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, धरमसिंग सैनी यांसारखे बलाढ्य नेते सपामध्ये दाखल झाले आहेत.
त्यांना हव्या त्या जागा देणे अखिलेश यांच्यासाठी अवघड काम ठरत आहे. धरमसिंह सैनी यांनी गेल्या निवडणुकीत सहारनपूर जिल्ह्यातील नकुड मतदारसंघातून काँग्रेसच्या इम्रान मसूद यांचा पराभव केला होता. आता हे दोघेही सपामध्ये सामील झाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील 40 जागांवर उमेदवार उतरविण्यासंदर्भात सपा आणि रालोद यांच्यात सहमती झाली होती.
यांपैकी 10 जागांवर सपाचे उमेदवार रालोदच्या चिह्नावर लढणार होते. जारी करण्यात आलेल्या यादीत 19 रालोद आणि 10 सपाचे उमेदवार होते. रालोदच्या उमेदवारांतही 2 सपाचेच नेते होते.कुशवाहा-राजभर -कधीकाळी मायावतींचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे बाबूसिंग कुशवाह यांचीही सपा आघाडीत सामील होण्याची इच्छा आहे. पण त्यांची पत्नी शिवकन्याच्या जागेसंदर्भात अद्याप ओमप्रकाश राजभर यांच्याशी सहमती होऊ शकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App