विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षात अखंड भारत पुन्हा निर्माण होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी अखंड भारताचे स्वप्न जरूर पूर्ण करावे. पण त्यापूर्वी त्यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडून घ्यावा. काश्मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावे. शिवसेना अखंड भारताचे समर्थनच करेल, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांनी डॉ. मोहन भागवत यांचे समर्थन केले आहे. Akhand Hindusthan: Fulfill the dream of Akhand Hindusthan but first give Bharat Ratna to Savarkar; Shiv Sena’s demand to Sangh !!
हरिद्वारमध्ये डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षात अखंड भारत पुन्हा एकदा अस्तित्वात येईल, असे वक्तव्य केले आहे. सनातन धर्मावर सतत हल्ले होत राहिले. त्यामुळे हिंदू जागा झाला आहे आणि या गतीने आपण आपली जागृती दाखवली तर अखंड भारताचे स्वप्न येत्या 15 वर्षात पूर्ण होऊ शकेल, असे वक्तव्य डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी अखंड भारताचे स्वप्न सर्वच राजकीय पक्ष बघतात. संघाशी वैचारिक मतभेद असणारे देखील अखंड भारताचे समर्थकच आहेत. परंतु अखंड भारताचा वादा 15 वर्षांचा आहे. त्याआधी येत्या 2 वर्षात पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताला जोडून घ्या. कधीकाळी भारताच्या सीमा कंदहारपर्यंत होत्या. तो भागही भारताला जोडून घ्या. श्रीलंकाही भारतात घ्या.आणि अखंड भारताला महासत्ता बनवा. हेच स्वप्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यापूर्वी काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरात सन्मानपूर्वक जागा मिळवून द्या. वीर सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App