कालपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीची छापेमारी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे धाडसत्र सुरू आहे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही प्राप्तिकरची धाड पडली आहे. Ajit Pawar says on raids of Income Tax Department, guests are in the house, Will Comment they leave
प्रतिनिधी
पुणे : कालपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीची छापेमारी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे धाडसत्र सुरू आहे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही प्राप्तिकरची धाड पडली आहे.
मुंबईतील नरिमन पॉइंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे प्राप्तिकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. 28 तासांपासून धाडी सुरू आहेत. 7 तारखेला सकाळी 6 वाजेपासून सुरू असलेले धाडसत्र आजही सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आयटीच्या धाडसत्रावर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन. जे सत्य आहे ते उघड होईल.”
मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी झाल्याची माहिती अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
7 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकरची धाडी पडली. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही विभागाने छापेमारी केली. छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती समोर आली आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील अंबालिका शुगर्स, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर विभागाची कारवाई सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App