प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची रात्र पार्थ पवारांच्या कार्यालयात, जवळपास 28 तासांपासून छापेमारी

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही प्राप्तिकर विभागाची छापेमारी सुरू आहे. 28 तासांहून जास्त काळापासून हे धाडसत्र सुरू आहे. विशेष म्हणजे प्राप्तिकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे. Income tax raids On Persons Close To Ajit Pawar And His son Parth Pawars Nariman Point office at Mumbai

काल संध्याकाही प्राप्तिकर विभागाने राज्यांतील धाडींसंदर्भात एक निवेदन प्रकाशित केले होते. यानुसार जवळपास 1059 कोटी रुपयांचा व्यवहार उघड झाला आहे. या सर्व व्यवहारात अनेक मध्यस्थ/दलालांची चौकशी आणि त्यासंबंधित पुरावे आयटी विभागाच्या हाती लागले आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजेपासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही प्राप्तिकर विभागाकडून छापेमारीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मुंबईत पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोराडिया ग्रुप, डीबी रियालिटी, या कंपन्यांच्या मालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी झाल्याची माहिती अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

7 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकरची धाडी पडली. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही विभागाने छापेमारी केली. छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती समोर आली आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील अंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर विभागाची कारवाई सुरू आहे.

Income tax raids On Persons Close To Ajit Pawar And His son Parth Pawars Nariman Point office at Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात