टेलीकॉम क्षेत्रासमोर एकच कंपनी प्रश्न निर्माण करतेय, एअरटेलचे सुनील मित्तल यांचा रिलायन्सवर नाव न घेता निशाणा

लोकांना फुकट इंटरनेट देण्याापासून ते कमी दरात सेवा पुरविण्यापर्यंत एका कंपनीने खूप तंत्रे वापरली. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील १२ पैकी ९ कंपन्यांना दिवाळखोरीमुळे आपला गाशा गुंडाळावा लागला, अशा शब्दांत भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी रिलायन्स कंपनीचे नाव न घेता टीका केली. मात्र, या स्पर्धेतून एअरटेल आणखी बळकट झाली असल्याचे भारतीय एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले.Airtel Sunil Mittal targets Reliance without naming Reliance


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकांना फुकट इंटरनेट देण्याापासून ते कमी दरात सेवा पुरविण्यापर्यंत एका कंपनीने खूप तंत्रे वापरली. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील १२ पैकी ९ कंपन्यांना दिवाळखोरीमुळे आपला गाशा गुंडाळावा लागला,

अशा शब्दांत भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी रिलायन्स कंपनीचे नाव न घेता टीका केली. मात्र, या स्पर्धेतून एअरटेल आणखी बळकट झाली असल्याचे भारतीय एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले.



दिल्लीत झालेल्या अ‍ॅमेझॉन संभव कार्यक्रमात बोलताना मित्तल म्हणाले, एअरटेलला गेल्या काही वर्षांत तीन-चार मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. त्यातील एक २०१६ मध्ये झालेले जिओचे लॉँचींग होते. मात्र, या संकटातून आम्ही तावून सुलाखून बाहेर आलो. आणखी सशक्त झालो आहोत.

याचे कारण म्हणजे आमच्यापुढे अत्यंत सशक्त असा प्रतिस्पर्धी उभा राहिला. एक वर्षासाठी मोफत सेवा, दुसºया वर्षासाठी कमी दरात सेवा, कमी किंमतीतील फोन देऊन बाजाराचे संतुलन बिघडू टाकले. या सगळ्यामुळे बारापैकी नऊ टेलीकॉम कंपन्यांना दिवाळखोरीत जावे लागले.

त्यांना आमच्यासोबत किंवा एकमेंकात विलीन व्हावे लागले. त्यामुळे सध्या या क्षेत्रात तीनच आॅपरेटर राहिले आहेत. त्यामध्ये एक कंपनी सतत प्रश्नचिन्ह निर्माणकरत आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ अडीच कंपन्या सेवा देत आहेत.

मित्तल म्हणाले, येत्या पाच ते दहा वर्षांत भारत एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर येणार आहे. त्यासाठी औद्योगिक आणि डिजीटल तंत्रामध्ये नवे तंत्रज्ञान येणे गरजेचे आहे.वादळावर स्वार होऊन एअरटेलने आपला बाजारातील हिस्सा वाढविला आहे.

आमची बॅँड लॉयल्टी वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून आमच्याकडे येणाºया ग्राहकांचे प्रमाण प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा वाढले आहे. आम्ही अनेन नवी सेवा सुरू केल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मित्तल यांनी सांगितले.

Airtel Sunil Mittal targets Reliance without naming Reliance

इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात