हवाई प्रवास रेल्वे तिकीटापेक्षा स्वस्त होणार आहेत. विमानाचे बुकिंग केल्यावर लोकांना रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवासाची ऑफर मिळत आहे.Airlines Offier: Air travel will be cheaper than railways
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सणांचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच नवरात्री ते दिवाळीपर्यंत विमान प्रवास रेल्वे प्रवासापेक्षा स्वस्त होणार असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वेच्या तिकीट दर जेवढं आहे तेवढ्याच तिकीट दारात विमान प्रवास करता येणार आहे.अशी सवलत विमान कंपन्या देत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हवाई प्रवास रेल्वे तिकीटापेक्षा स्वस्त होणार आहेत. विमानाचे बुकिंग केल्यावर लोकांना रेल्वेपेक्षा स्वस्त विमान प्रवासाची ऑफर मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-दिल्ली मार्गावर रेल्वेच्या सेकंड एसी कोचचे भाडे ३५७५ रुपये आहे. सणांचा काळ संपल्यानंतर विमानाच्या प्रवासाचे भाडे ३५७५ वरून २४६३ रुपये प्रति प्रवासी होणार आहे.
तसेच मुंबई-बंगळुरु मार्गावरील रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या एसी कोचचे भाडे २१२५ रुपये आहे. या मार्गावरील विमानांचे भाडे १९९५ रुपयांपर्यंत कमी केले जाणार आहे.
दिल्ली-चंदीगड मार्गावरील रेल्वेच्या द्वितीय श्रेणीच्या डब्याचे भाडे २५७० रुपये आहे. त्याचबरोबर एअर प्लेनचे भाडे १२८३ रुपयांनी कमी होणार आहे.
देशात सणांचा हंगाम नवरात्र ते दिवाळीपर्यंत असतो. यावेळी लोकांमध्ये त्यांच्या घरी येण्या जाण्याचा प्रवास सुरूच असतो. यामुळे बस, रेल्वे आणि विमानाची तिकिटे महाग होत आहेत. हा काळ संपल्यानंतर लोकांचा प्रवास अचानक कमी होतो.त्यामुळे विमान कंपन्या त्यांच्या तिकिटांच्या किंमती कमी करून विमान प्रवासात वाढ करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App