AIIMS Students Association : दसऱ्याच्या दिवशी एम्स दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी भगवान राम आणि सीता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एम्सच्या विद्यार्थी संघटनेने माफी मागितली आहे. AIIMS Students Association Issues Apology After Video Of Controversial Remarks On Dussehra Went Viral
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी एम्स दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी भगवान राम आणि सीता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एम्सच्या विद्यार्थी संघटनेने माफी मागितली आहे.
दसऱ्याच्या दिवशी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एम्सच्या काही विद्यार्थ्यांनी रामायण, भगवान राम आणि माता सीता यांची चेष्टा केली आणि त्यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर एम्स विद्यार्थी संघटनेने ट्विटरवर माफी मागितली आहे.
असोसिएशनने पोस्ट केले आहे, काही एम्स विद्यार्थ्यांची रामलीलाची थट्टा करणारी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. त्यंाचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ.
विद्यार्थी संघटनेने ट्विटर पोस्ट टाकून माफी मागितली असली, तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
AIIMS Students Association Issues Apology After Video Of Controversial Remarks On Dussehra Went Viral
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App