केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी अग्निपथ सैन्यभरती योजनेला जो आक्रस्ताळा आणि अतिहिंसक विरोध होत आहे, तो केवळ एकाच दिशेने अथवा एकांगी नाही. तर गैरसमज ते टूलकिट अशा विविध लेयर्समधून तो होतो आहे. तो नीट समजून घेतला पाहिजे. Agnipath recruitment : understanding the toolkit behind opposition and Violence
– सैन्य दलाची संपूर्ण संरचना बदलण्याचा गैरसमज
सैन्यदलाची संपूर्ण संरचना बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज पसरला असल्याने प्रामुख्याने बिहार मध्ये या विरोधाचे सुरुवात झाली आहे. बिहार रेजिमेंटच पूर्णपणे मोडीत काढण्याचा गैरसमज हेतुतः पसरवला गेला आहे. त्यामागे कोचिंग क्लास माफिया असल्याचा पुराव्यांसह समज आहे. ही वस्तुस्थिती देखील आहे. अर्थात भरती प्रक्रियेबाबत अनेक गैरसमज देखील आहेत. पण प्रामुख्याने गैरसमज सैन्यदल संरचना बदलण्याचा आहे.
– ठिणगीचे आगीत रूपांतर करणारे टूलकिट
पण बिहार मध्ये हा जो विरोध होत आहे, ती केवळ एक ठिणगी होती. तिचे आगीत रूपांतर करण्यासाठी टूलकिट वापरण्यात आले आहे. आणि हे टूलकिट अधिक गंभीर आहे.
राहुल गांधी, सलमान खुर्शीद, सीताराम येचुरी, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा यांच्या ब्रिटन दौऱ्यानंतर अग्निपथ योजनेच्या विरोधात टूलकिट ऍक्टिव्हेट झाली हा निव्वळ योगायोग नाही!!
– ब्रिटिश मानसिकतेतून विरोध
शिवाय हे टूलकिट तरी का ऍक्टिव्हेट झाले??, तर खरंच अग्निपथ योजनेच्या भरतीतून जी संरक्षण दलाची संरचना बदलण्यात येत आहे, ती थेट ब्रिटिशांनी मी वर्षानुवर्षे खपून तयार केलेल्या भारतीय संरक्षण दलाच्या संरचनेला धक्का लावणारी आहे. ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी नेमके काय केले?, तर भारतीयांची “मार्शल रेस” आणि “नॉन मार्शल रेस” अशी विभागणी करून लष्करी मानसिकतेची एकजिनसीता संपवली. ही एकजिनसीता संपल्यामुळे भारत यांची लष्करी विजयाची विजिगीषू वृत्ती संपली. त्याचे दीर्घकाळानंतर रूपांतर नि:शस्त्र सत्याग्रह वगैरे संकल्पनांमध्ये प्रतिबिंबित झाले.
– “मार्शल रेस”, “नॉन मार्शल रेस” भेदभाव
“मार्शल रेस” या त्याच ठरल्या की ज्यांनी ब्रिटिशांना 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर अनुकूल भूमिका घेतली. बाकीच्यांना “नॉन मार्शल रेस” ठरवून प्रामुख्याने त्यातून हिंदू समाजाला टप्प्याटप्प्याने संपूर्णपणे निःशस्त्र करण्यात आले. ब्रिटिशांनी आपल्याला अनुकूल ठरेल अशी भारतीय संरक्षण दलाची संरचना उत्क्रांत केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1965 नंतर “मार्शल रेस”, “नॉन मार्शल रेस” ही संरचना जरी संपुष्टात आणली असली तरी ती मानसिकता सत्ताधारी काँग्रेसमध्ये मात्र कायम राहिली. सत्ताधारी काँग्रेसने ब्रिटीशांनी घालून दिलेले पायंडे, तयार केलेल्या संरचना यांना कोठेही धक्का न लावता राज्य केले. यात राजकीय संसदीय संरचना आणि आर्थिक संरचनेचे पासून संरक्षण दलातील संरचने पर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे.
– ब्रिटिश संरचनेला मोदी सरकारचा धक्का
आता मोदी सरकार ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या संरक्षण संरक्षण हिलाच धक्का लावत असल्याने एक प्रकारे काँग्रेस मानसिकता असलेल्या एलीट क्लासला धक्का बसला आहे आणि त्यातून अग्निपथ योजनेच्या विरोधातले बौद्धिक इंधन पुरवले जात आहे. काँग्रेस हा पक्ष असा आहे की ज्याने उघडपणे आपण अग्निपथ योजनेच्या विरोधातील विद्यार्थ्यांची बाजू घेऊन आंदोलनाच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. यामागचे खरे इंगित ब्रिटिशांनी तयार केलेल्या संरक्षण संरचनेला धक्का लागण्यामागले आहे.
– अति उजव्यांचा विरोध का??
अग्निपथ योजनेला अति उजव्या विचारवंतांकडून देखील विरोध होताना दिसतो आहे. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाची धार्मिक फाळणी देखील झाली. ब्रिटिश सैन्यात सेवेला असलेले मुस्लिम सैनिक पाकिस्तानात निघून गेले. त्यामुळे भारतीय सैन्यदले आपोआपच 90 टक्क्यांपर्यंत “हिंदू” झाली. अग्निपथ योजनेतून अग्निवीरांच्या भरतीतून सैन्यदल यांचे हे प्रमाण विसकटण्याची भीती अतिउजव्या हिंदू विचारवंतांना वाटत आहे.
– जिहादी मानसिकतेतून भरतीची भीती
ज्याप्रमाणे प्रशासकीय सेवेमध्ये “प्रशासकीय जिहाद” मधून मुस्लिमांची भरती ठरवून करण्यात येते, तसाच अग्निवीर भरतीत विशिष्ट जिहाद पसरवून भरती करण्यात येईल, ही भीती संजय दीक्षित, तारेक फतेह, तौफेल चतुर्वेदी आणि काही लष्करी अधिकारी व्यक्त करताना दिसतात. या भीतीमध्ये अजिबातच तथ्य नाही, असे म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासकीय जिहाद प्रत्यक्ष अनुभवायला आला आहे. पण या जिहादला सरकारकडे उत्तरच नाही असे मात्र अजिबात नाही. काही विशिष्ट काळ गेल्यानंतर याचे उत्तर दिसून येणार आहे, अशी ग्वाही गौरव प्रधान यांच्यासारखे इन्साईडर स्ट्रॅटेजीस्ट उघडपणे सांगताना दिसतात.
– टूलकिटला काटशह कसा देणार?,
मोदी सरकारच्या विरोधातला टूलकिट पॅटर्न समान दिसतो सीएए – एनआरसी विरोधात शाहीनबागी आंदोलनात हे टूलकिट दिसले. शेतकरी आंदोलनात असेच टूलकिट वापरले आणि आता अग्निपथ अग्निवीर सैन्यदल भरतीच्या विरोधात हे टूलकिट वापरले जात आहे. हे टूल किट जर सरकारने व्यवस्थित आयडेंटिफाय केले आहे तर या टूलकिट ला काटशह देण्यासाठी सरकारची योजना तयार असले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App