Agnipath recruitment : काँग्रेसचा विरोध, पण खासदार मनीष तिवारींकडून योजनेचे समर्थन!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ सैन्यदल भरती योजनेस काँग्रेसने विरोध केला असला तरी काँग्रेस पंजाब मधील आनंदपुर साहिबचे खासदार मनीष तिवारी यांनी अग्निपथ योजनेचे जोरदार समर्थन केले आहे. अग्निपथ योजना भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी अत्यंत गरजेची आहे. आधुनिक काळातील युद्धतंत्र आणि युद्ध कौशल्य आत्मसात करण्याची तरुणांना संधी मिळाली आहे, अशा शब्दात मनीष तिवारी यांनी अग्निपथ योजनेचे समर्थन केले आहे. मनीष तिवारी यांनी जाहीरपणे अपने पति योजनेचे समर्थन केल्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेला छेद गेला आहे. Agnipath recruitment: Congress opposes, but MP Manish Tiwari supports plan

भारतीय लष्कराला अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या युवकांची गरज आहे. भारतीय सैन्यदले स्वतः पुढाकार घेऊन तरुणांना प्रशिक्षित करणार आहेत. या भरती योजनेत काही त्रुटी आणि शंका असू शकतात. त्या दूर कराव्यात. परंतु, अग्निवीर भरती योजनेला केवळ विरोधासाठी विरोध करता कामा नये, त्याचबरोबर अग्निविर भरती म्हणजे कुठलीही रोजगार गॅरंटी स्कीम नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी या योजनेवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकार बेरोजगार युवकांची अग्निपरीक्षा घेत आहे. करोडो युवकांना हाताला काम पाहिजे आणि अग्निपथ योजनेतून सरकार युवकांची अग्निपरीक्षा घेत आहे, असे शरसंधान राहुल गांधी यांनी साधले होते. मात्र, मनीष तिवारी यांच्या वक्तव्यातून राहुल गांधींच्या युक्तिवादाला छेद गेला आहे.

– सप्तागिरी ऊलूकांना प्रत्युत्तर

काँग्रेसचे ओरिसातील कोरापुटचे खासदार सप्तगिरी ऊलाका यांनी मनीष तिवारी यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना मनीष तिवारी यांनी सप्तागिरी हे निकर्सवर मित्रांबरोबर फिरत होते तेव्हापासून आपण काँग्रेसचे काम करत असल्याचे शरसंधान साधले आहे.

Agnipath recruitment: Congress opposes, but MP Manish Tiwari supports plan

महत्वाच्या बातम्या