वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. दरम्यान, सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 4 ची चाचणी घेण्यात आली. प्रशिक्षण प्रक्षेपण म्हणून अग्नि 4 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. अग्नी-4 क्षेपणास्त्राची ही चाचणी सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.Agni 4 Missile India successfully tests Agni 4 ballistic missile, capable of hitting a range of 4000 km
यावेळी संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, यादरम्यान त्याच्या सर्व पॅरामीटर्सची चाचणी घेण्यात आली तसेच या प्रणालीचीही चाचणी घेण्यात आली. हे प्रक्षेपण स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत नियमित वापरकर्ता प्रशिक्षणाचा एक भाग होता. ही यशस्वी चाचणी भारताच्या विश्वासार्ह किमान प्रतिबंधाच्या धोरणाला बळकटी देते. भारताच्या या शक्तिशाली क्षेपणास्त्राची रचना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) तयार केली आहे. त्याच वेळी, भारत डायनॅमिक्स लिमिटेडने त्याचे उत्पादन केले आहे.
आधुनिक उपकरणांनी सुसज्ज
अग्नी 4 क्षेपणास्त्राचे एकूण वजन 17000 किलोपर्यंत आहे. त्याची लांबी 20 मीटर आहे. त्यात स्फोटकांच्या रूपात सामरिक अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे. ते 900 किमी उंचीपर्यंतदेखील उड्डाण करू शकते. तसेच त्यात अनेक आधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. यात रिंग लेझर गायरो इनरशियल नेव्हिगेशन सिस्टमदेखील आहे. त्याची मारक क्षमता अचूक आहे.
मंत्रालयाचा क्षेपणास्त्रांबाबत करार
यापूर्वी 31 मे रोजी संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) सोबत एअर-टू-एअर Mk-I क्षेपणास्त्रे आणि संबंधित उपकरणे खरेदीसाठी 2,971 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलासाठी ही क्षेपणास्त्रे खरेदी केली जात असल्याचे मंत्रालयाने सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना म्हणून ही क्षेपणास्त्रे खरेदी केली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App