उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. तिकीट कापण्याच्या भीतीने अनेक जण समाजवादी पक्षात पलायन करत आहेत. आतापर्यंत अनेक कॅबिनेट मंत्री व आमदारांनी राजीनामा दिला आहे.After the resignation, MLA Mukesh Verma made a big claim, said- 100 MLAs in touch UP Elections 2022
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरू झाले आहे. तिकीट कापण्याच्या भीतीने अनेक जण समाजवादी पक्षात पलायन करत आहेत. आतापर्यंत अनेक कॅबिनेट मंत्री व आमदारांनी राजीनामा दिला आहे.
आतापर्यंत स्वामी प्रसाद मौर्य आणि दारा सिंह यांच्यासह अनेकांनी राजीनामे दिल्यानंतर, आता फिरोजाबादमधील शिकोहाबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मुकेश वर्मा यांनी कित्ता गिरवला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपकडे पाठ फिरवणारे ते सातवे आमदार आहेत.
“स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेते आहेत आणि ते जो काही निर्णय घेतील, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ,” असे वर्मा यांनी गुरुवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सांगितले. वर्मा यांनी दावा केला की आगामी काळात आणखी नेते त्यांच्यासोबत येतील.
एका ट्विटमध्ये वर्मा म्हणाले- भाजप सरकारच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात दलित, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील नेते आणि लोकप्रतिनिधींकडे लक्ष दिले गेले नाही आणि दलित, मागासलेले शेतकरी आणि बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाले. या कारणास्तव मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
प्रचंड पाठिंब्याचा दावा करत वर्मा म्हणाले- ‘आमच्यासोबत 100 आमदार आहेत आणि भाजपला रोज इंजेक्शन दिले जाईल. भाजप हा पूर्वापार चालत आलेल्यांचा पक्ष असून दलित व मागासवर्गीयांचा आदर नसल्याचे ते म्हणाले. मागासवर्गीयांना टार्गेट करून नोकऱ्या दिल्या जात नसल्याचा दावा केला. वर्मा म्हणाले की, भाजप दलित, अल्पसंख्याक आणि मागास विरोधी आहे.
विशेष म्हणजे, स्वामी प्रसाद मौर्य जे मातब्बर दलित नेते समजले जातात, त्यांनी पाच वर्षे कॅबिनेट मंत्रिपद उपभोगले आणि आता निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजप दलितविरोधी असल्याचा शोध लावला आहे. भाजप सोडून जाणाऱ्या बहुतांश आमदार, मंत्र्यांचा भाजप दलितविरोधी असल्याचा एकच सूर आहे. राजीनामा दिला की अखिलेश यादवांसोबत त्यांचे फोटो झळकू लागले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App