विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20000 कोटी रुपये आले कुठून?, हा मूळ प्रश्न विचारण्यावर राहुल गांधी आजही ठाम आहेत. अदानी मुद्द्यावर शरद पवारांनी वेगळा सूर लावून पाहिला. त्यानंतर अदानी समूहाने 20000 कोटींपेक्षाही जास्त म्हणजे 23500 कोटी रुपयांचा हिशेब सार्वजनिक रित्या दिला. पण त्यानंतरही राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते आपल्या मूळ मुद्द्यावर ठाम आहेत. राहुल गांधींचा मतदारसंघ वायनाड मध्ये याचे प्रत्यंतर आले. After sharad Pawar favoured adani and adani clarified of 23500 investment rahul Gandhi and Congress don’t miss “the target”
देशातील सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची सजा फर्मावली. त्यामुळे नियमानुसार त्यांची खासदारकी रद्द झाली. दरम्यानच्या काळात अदानी मुद्द्यावर राजकीय गदारोळ सुरू असताना शरद पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन काँग्रेसपेक्षा वेगळा सूर लावला. त्यांनी त्याआधी सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले होते. तसेच अदानी मुद्द्यावर करता येईल, असा त्यांचा होरा होता. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. शरद पवारांनी वेगळा सूर लावला म्हणून राहुल गांधी आणि काँग्रेस अदानी मुद्द्यावर माघार घ्यायला तयार नाहीत. इतकेच नाही तर अदानी समूहाने 23500 कोटी रुपये कसे जमा केले याचे तपशीलवार खुलासे जाहीररीत्या केले, तरीदेखील आजच्या वायनाडच्या जाहीर सभेत राहुल गांधींनी आणि प्रियांका गांधींनी अदानी मुद्दा जसाच्या तसा लावून धरला होता.
अदानींच्या शेल कंपनीत एलआयसी सारख्या कंपन्यांमध्ये सर्वसामान्य जनतेने गुंतवलेले पैसे सरकारने ढकलले आहेत. त्याचा हिशेब मिळालाच पाहिजे, अशी मागणी प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी वायनाड मध्ये केली, तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईत या मागणीला पुन्हा दुजोरा दिला.
शरद पवारांनी अदानींची बाजू उचलून धरल्याने आणि त्यानंतर अदानी समूहाने 23500 कोटी रुपयांचा हिशेब दिल्याने तो मुद्दा थंड्या बस्त्यात जाईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात वायनाड मध्ये तसे घडले नाही. उलट आम्ही प्रश्न विचारतच राहणार. या देशाचे पंतप्रधान दिवसाला 27 रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू शकतात. पण गौतम अदानी नावाच्या एका आपल्या उद्योगपती मित्राला ते वाचवतायेत, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आणि त्याच आरोपाचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. खासदारकी रद्द करून माझा बंगला काढून घ्याल. संसद सदस्यत्व काढून घ्याल पण वायनाडशी आणि वायनाडच्या जनतेशी असलेले माझे भावनिक नाते तुम्हाला संपवता येणार नाही, असा इशाराही राहुल गांधींनी मोदी सरकारला दिला.
एकूण सत्ताधारी आघाडी, विरोधकांमधले शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आणि दस्तूर खुद्द अदानी समूह यांच्या विशिष्ट प्रयत्नानंतरही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तसेच काँग्रेसने अदानी मुद्द्यावर माघार घेतलेली नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App