प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022 – 23 चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अनेक खोचक प्रश्नांना टोले लावत परखड उत्तरे दिली. त्यानंतर काँग्रेसने निर्मला सीतारामन यांच्यासमोर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अर्थसंकल्पावरील वादविवादाच्या मैदानात उतरवले.After Nirmala Sitharaman’s scathing reply, Congress fielded Chidambaram in the budget arena
निर्मला सीतारामन यांच्यावर पत्रकार परिषदेत खोचक प्रश्नांचा मारा करण्यात आला. त्यामध्ये काँग्रेस नेत्यांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेचा प्रामुख्याने उल्लेख होता. शेतकरी, मध्यमवर्गीय, महिला यांच्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही नसल्याची टीका राहुल गांधी आणि शशी थरूर यांनी ट्विट करून केली होती. या संदर्भातल्या प्रश्नाचे उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी पंजाब, महाराष्ट्र यांच्यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी,
मध्यमवर्गीयांसाठी आणि महिलांसाठी कोणत्या आर्थिक उपाययोजना केल्या?, असा परखड सवाल केला. केंद्रीय अर्थसंकल्पावर जरूर टीका करण्यात यावी. परंतु जे काँग्रेसचे नेते आपल्या राज्यांमधल्या राजवटीत सर्वसामान्य जनतेला आर्थिक दिलासा देत नाहीत, त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला आपण बांधील नाही, असे उद्गार निर्मला सीतारामन यांनी काढले.
राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन “झिरोसम बजेट” असे केले आहे. त्यावर उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसच्याच राज्यांमध्ये सर्व समाजाची “झिरोसम अवस्था” झाली असल्याचे प्रत्युत्तर दिले.
महागाई संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महागाई निर्देशांक 6 टक्क्यांवर एखाद दुसऱ्या महिन्यात गेल्याचे मान्य केले. परंतु, 2014 पूर्वी महागाई निर्देशांक डबल डिजिट असायचा. तो दहा-बारा टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, याकडे लक्ष वेधले. त्यावेळी देशात काँग्रेस प्रणित यूपीएचे राजवट होती याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.
Today's budget speech was the most capitalist speech to be ever read by an FM. The word 'poor' occurs only twice in para 6 & we thank FM for remembering that there are poor people in this country; people will reject this capitalist budget: Former FM &Congress leader P Chidambaram pic.twitter.com/NHBTlO46Pv — ANI (@ANI) February 1, 2022
Today's budget speech was the most capitalist speech to be ever read by an FM. The word 'poor' occurs only twice in para 6 & we thank FM for remembering that there are poor people in this country; people will reject this capitalist budget: Former FM &Congress leader P Chidambaram pic.twitter.com/NHBTlO46Pv
— ANI (@ANI) February 1, 2022
त्याच वेळी देशात बेरोजगारी वाढली असल्याचा प्रश्नही निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आला. बेरोजगारी कोरोना महामारीच्या काळात वाढली हे आपण अमान्य करत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. त्याच वेळी सरकार रोजगार निर्माण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात करते आहे याचेही तपशीलवार उत्तर दिले.
महागाईवर उपाय योजना करताना स्थायी स्वरूपाच्या उपाययोजनांवर भर असल्याचे त्यांनी सांगितले. खाद्य तेलाचे उत्पादन देशांतर्गतच वाढावे यासाठी सरकार कसे प्रयत्न करत आहे, तेलबियांचे उत्पादन कृषी क्षेत्रात वाढण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या योजना केल्या आहेत, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे.
निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत परखडपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर आणि काँग्रेस वरील टीका परतवून लावल्यानंतर काँग्रेसने पी. चिदंबरम यांना मैदानात उतरवले. पी. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून आठ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. भारतात गरीब लोक राहत आहेत याचा सरकारला विसर पडला आहे.
निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात “गरीब” हा शब्द फक्त दोनदा आला आहे, असे टीकास्त्र पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत सोडले आहे. देशातील जनतेला अमृत काळाची वाट पाहायला लावणे हे मध्यमवर्गीय जनतेची चेष्टा करण्यासारखे आहे. मनरेगा सारख्या गरिबांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या योजनेचा उल्लेख देखील केंद्रीय अर्थसंकल्पात नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे.
राहुल गांधी आणि शशी थरूर यांनी केलेल्या टीकेला निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. परंतु आता पी. चिदंबरम यांनी केलेल्या टीकेला त्या कोणते प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App