“कररचनेत बदल नाहीत, सामान्यांना दिलासा नाही”, प्रश्नावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे “ट्विस्टेड” उत्तर!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कररचनेत बदल केले नाहीत. सर्वसामान्य नोकरदारांना केंद्रीय अर्थसंकल्पात दिलासा दिला नाही. असे का केले?, या प्रश्‍नावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत एक ट्विस्टेड उत्तर दिले.There are no changes in the tax structure, no relief to the common man

कोरोना महामारीच्या काळात जनतेवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी कोणत्याही प्रकारचे कर वाढवू नयेत, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. या सूचना प्रामुख्याने गेल्या वर्षीसाठी होत्या. तशाच सूचना या वर्षीसाठीही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कररचनेत फेरबदल करून कर वाढवून जनतेवर बोजा टाकलेला नाही, असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिले.



कोरोना महामारीच्या काळात वित्तीय तूट कितीही वाढली तरी सर्वसामान्यांवर कर वाढवून बोजा टाकायचा नाही, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या होत्या. वित्तीय तुटीवर तोडगा काढण्यासाठी वेगळे मार्ग शोधा. पण कर वाढवू नका, असा पंतप्रधानांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही कररचनेत बदल करून कर वाढवले नाहीत, असे उत्तर निर्मला सीतारामन यांनी दिले.

प्रत्यक्षात हा प्रश्न कररचनेत बदल करून मध्यमवर्गीय नोकरदार यांना दिलासा देण्यासंदर्भातला होता. गेल्या 6 वर्षात कररचनेत फेरबदल केलेला नाही. कोरोना काळात मध्यमवर्गीय नोकरदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर नोकरदारांचे पगारही घटले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात कररचनेत बदल करून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यात येईल, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. पत्रकारांचे प्रश्न या संदर्भातले होते. परंतु निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात गेल्या दोन वर्षात कर वाढवले नाहीत, असे उत्तर देऊन मूळ प्रश्नाला ट्विस्ट देऊन टाकला.

There are no changes in the tax structure, no relief to the common man

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात