Yellow Fungus : काळ्या-पांढऱ्या बुरशीपेक्षाही धोकादायक पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळला, जाणून घ्या लक्षणे

After Black And White Fungus Now Yellow Fungus Detected in Patient in Ghaziabad UP Reports

Yellow Fungus : कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान काळी बुरशी (Black Fungus) आणि पांढरी बुरशी (White Fungus)या आजारांनीही अडचणीत भर घातली आहे. आता पिवळ्या बुरशीचाही (Yellow Fungus) रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यलो फंगसचे हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आले आहे. काळ्या-पांढर्‍या बुरशीपेक्षा पिवळ्या बुरशीचे प्रमाण जास्त धोकादायक आहे, असा दावा येथील तज्ज्ञांनी केला आहे. After Black And White Fungus Now Yellow Fungus Detected in Patient in Ghaziabad UP Reports


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान काळी बुरशी (Black Fungus) आणि पांढरी बुरशी (White Fungus)या आजारांनीही अडचणीत भर घातली आहे. आता पिवळ्या बुरशीचाही (Yellow Fungus) रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यलो फंगसचे हे प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधून समोर आले आहे. काळ्या-पांढर्‍या बुरशीपेक्षा पिवळ्या बुरशीचे प्रमाण जास्त धोकादायक आहे, असा दावा येथील तज्ज्ञांनी केला आहे.

पांढरी बुरशी रुग्णाच्या फुप्फुसावर परिणाम करते, तर काळी बुरशी मेंदूवर हल्ला चढवते. परंतु ही पिवळी बुरशी या दोन्हींपेक्षाही धोकादायक आहे. आजवर कोणत्याही माणसात अशा प्रकारची बुरशी आढळली नव्हती. तथापि, काही प्राण्यांमध्ये अशी बुरशी आढळत असते.

पिवळ्या बुरशीची लक्षणे कोणती?

पिवळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास नाक वाहणे, डोकेदुखी अशीच लक्षणे आहेत. परंतु ही बुरशी जखम भरू देत नाही. याचमुळे ही जास्त खतरनाक म्हटली जाते. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, गाझियाबादच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्याकडे एका रुग्णात तिन्ही प्रकारची बुरशी आढळली. ही पिवळी बुरशी मी माझ्या 30 वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच पाहिल्याचे ते म्हणाले.

पिवळी बुरशी किती धोकादायक?

डॉक्टरांच्या मते, आजपर्यंत कोणत्याही मनुष्यात पिवळी बुरशी आढळलेली नाही. या बुरशीला म्युकरसेप्टिकल्स नावाने ओळखले जाते. ही अद्याप मानवांमध्ये सापडलेली नव्हती. ही बुरशी नाकात जी जखम तयार करते, ती जेव्हा डॉक्टर स्वच्छ करतात, तेव्हा ती भरू देत नाही. त्यातून पस आणि रक्त वाहत राहते. याचमुळे ही आधीच दोन्ही बुरशींपेक्षा धोकादायक आहे.

ज्या रुग्णात पिवळी बुरशीचा प्रादुर्भाव आढळला आहे, त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांच्या वडिलांना दोन महिन्यांपासून कोरोना आहे. ते बरहे होत होते, परंतु काल अचानक नाक आणि डोळ्यात रक्त आल्यानंतर त्यांना येथे आणण्यात आले. तर गाझियाबादचे सीएमओ डॉ. नरेंद्र गुप्ता यांनी फोनवर म्हटले की, पिवळ्या बुरशीसारखा कोणताही रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही.

After Black And White Fungus Now Yellow Fungus Detected in Patient in Ghaziabad UP Reports

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात