विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीत बंगाली मुस्लिमांच्या मतांवर डोळा ठेऊन कॉँग्रेसने बद्रुद्दीन अजमलच्या अखिल भारतीय युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटशी (एआययूडीएफ) आघाडी तोडली आहे. सोमवारी दुपारी गुवाहाटीमध्ये पक्षाच्या चार तासांच्या कोर कमिटी बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. अजमल हे भाजपाच्या जवळ गेले असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. After Badruddin Ajmal’s kiss with AIUDF, Congress broke alliance with AIUDF, accusing him of having links with BJP.
आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवेदनात म्हटले आहे की, एआयूडीएफशी आघाडी तोडण्याचा निर्णय सवार्नुमते निर्णय घेण्यात आला आहे. एआययूडीएफ आणि त्या पक्षाचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल भारतीय जनता पक्षाची ज्या पधदतीने स्तुतीत करत आहेत ते पाहता हा पक्ष कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोतचा सहयोगी राहू शकत नाही.
आसाम विधानसभेच्या तोंडावर कॉँग्रेसने सीपीआय, सीपीआय(एम), आंचलिक गण मोर्चा, सीपीआय (एमएल) यांच्यासह अजमल यांच्या एआययूडीएफशी युती केली होती. अत्तराचे व्यापारी असलेले खासदार बदु्रद्दीन अजमल हे आसाममधील कट्टरवादाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अजमल यांच्याशी आघाडी केल्याने कॉँग्रेसला मोठा फटका बसला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रचाराचा मुद्दा केला होता. अजमल यांच्यामुळे हीआघाडी बेकायदेशिर स्थलांतराला प्रोत्साहन देईल, असे म्हटले होते.
अजमल यांच्या सोबतीचा कॉँग्रेसला चांगलाच फटका बसला. कॉँग्रेसला केवळ २९ जागा मिळू शकल्या. याउलट एआययूडीएफला मात्र १६ जागा मिळाल्या.
एआययूडीएफचे अमीनुल इस्लाम म्हणाले की, काँग्रेसचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे शेवटी भाजपालाच फायदा होणार आहे. आसाममध्ये भाजपाचा पराभव करायचा असेल तर कॉँग्रेसला छोट्या पक्षांशी युती करावीच लागेल.
काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळागाळातील कार्यकर्ते एआययूडीएफसोबतच्या युतीमुळे नाराज होते. जेव्हा मी हिंदूबहुल भागात प्रचार करायला गेलो होतो, तेव्हा मला माझीच लाज वाटली, असे अप्पर आसामामधील एका कॉँग्रेस नेत्याने सांगितले. मला मतदान करणे म्हणजे अजमलला मतदान करण्यासारखे आहे, असेही अनेकांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
आसाम कॉँग्रेसच्या नेत्या सुस्मिता देव यांनी नुकताच कॉँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बराक व्हॅलीमध्ये एआययूडीएफला दिलेल्या जागा हे त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण होते. या युतीमुळे कॉँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागल्याचे कॉँग्रेसचेच नेते म्हणत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App