अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी नको, भारताच्या पुढाकाराने बैठकीत आठ देशांनी ठणकावले


अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी अजिबात होता कामा नये, अशा शब्दांत भारताच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत आठ देशांनी ठणकावले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला यातून इशारा देण्यात आलाआहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला चीन व पाकिस्तानने मात्र गैरहजेरी लावली.Afghanistan’s land not to be used for terrorist activities, at the meeting, eight countries clashed over India’s initiative


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी अजिबात होता कामा नये, अशा शब्दांत भारताच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत आठ देशांनी ठणकावले आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला यातून इशारा देण्यात आलाआहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारताच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला चीन व पाकिस्तानने मात्र गैरहजेरी लावली.

भारताचे राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारत, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, इराण, रशिया या आठ देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते. एकमताने संमत ठरावात म्हटले आहे की, दहशतवाद्यांना आश्रय, प्रशिक्षण, आर्थिक रसद पुरविण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर होता कामा नये. त्या देशात शांतता व स्थैर्य टिकून राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


कॅप्टन साहेब out of the way; अजित डोवाल यांच्याशी घरी जाऊन महत्त्वपूर्ण चर्चा!!


या बैठकीला आपण उपस्थित राहत नसल्याचे पाकिस्तान, चीनने गेल्या आठवड्यात कळविले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीत सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे फक्त तेथील जनतेवरच नव्हे, तर त्याच्या शेजारील देशांवरही परिणाम झाला आहे. त्यातून निर्माण झालेली आव्हाने पेलण्यासाठी अफगाणिस्तानच्या परिसरात असलेल्या देशांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

फगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी इराणने २०१८ ला आशियातील काही देशांची पहिली बैठक बोलाविली होती. त्यानंतर दुसरी बैठकही झाली. तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्याची भारताला संधी मिळाली. अफगाणिस्तानला विविध प्रकारे साहाय्य करण्यावरही बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत आठही देशांचे एकमत झाले. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील महिला, मुले, अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांवर गदा येता कामा नये या गोष्टींवरही दिल्लीतील आठ देशांच्या बैठकीत एकमत झाले. दहशतवादी कुंदुज, कंदाहार, काबूल येथे करत असलेल्या हल्ल्यांबाबत या बैठकीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

Afghanistan’s land not to be used for terrorist activities, at the meeting, eight countries clashed over India’s initiative

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात