वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुक्रवारी पत्र लिहून त्यांची माफी मागितली. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात चौधरी यांनी लिहिले की,‘चुकीच्या शब्दाचा वापर केल्यामुळे तुमची माफी मागण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. मी आपली माफी मागतो आणि ती स्वीकारावी, अशी विनंती करतो.’Adhir Ranjan Chowdhury wrote a letter asking for President Murmu’s apology, BJP’s position- the work will continue only after Sonia apologizes
चौधरी यांनी बुधवारी विजय चौकात निदर्शनांदरम्यान माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपतींना ‘राष्ट्रपत्नी’ संबोधले होते. त्यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी यासाठी पक्ष अडून बसला आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी म्हटले की, ‘सोनिया गांधी जेव्हा माफी मागतील तेव्हाच सभागृहाचे कामकाज सुरू होईल.‘हे वक्तव्य काँग्रेस नेत्यांची मानसिकता दर्शवते,’ अशी टिप्पणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणाले, ‘घटनात्मक पदावरील प्रत्येक व्यक्तीबाबत लैंगिक आधारावर कुठलीही टिप्पणी करणे योग्य नाही.’ याच मुद्द्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App