प्रतिनिधी
मुंबई – आणीबाणीत बॅन झालेल्या पण १९७८ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत प्रदर्शित झालेल्या “किस्सा कुर्सी का” सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या.Actor surekha sikri dies of heart attack in mumbai, debuent in kissa kursi ka 1978
सुरेखा सिक्री यांचे आज हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचे निधन झाले.
सुरेखा सिक्री यांनी आत्तापर्यंत नाटके, मालिका, समांतर चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केले. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केले होते. हा सिनेमा इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीत बॅन करण्यात आला होता. मात्र, जनता पक्षाच्या राजवटीत १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
सुरेखा सिक्री यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना तमस (१९८८), मम्मो (१९९५) आणि बधाई हो (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App