विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हाय रिस्क संपर्कात आलेल्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन आवश्यक आहे.आलिया भट्टचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी होम क्वारंटाईनच्या अटींचा भंग केल्यामुळे अभिनेत्री आलिया भट्टवर महामारी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.Action will be taken against actress Alia Bhatt, breach of home quarantine despite being in high risk contact
होम क्वारंटाईन होणे आवश्यक असतानाही ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या लॉन्चसाठी आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीत आली होती. तेथे अनेक लोकांना भेटली. अशा परिस्थितीत आलियाने नियम मोडला आहे. बीएमसी या प्रकरणाची चौकशी करत होती आणि उल्लंघनाची पुष्टी केल्यानंतर, आता अभिनेत्रीवर गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे.
बीएमसी आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल म्हणाले, मी डीएमसी आरोग्य विभागाला आलिया भट्टाविरुद्ध होम आयसोलेशन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. ती एक रोल मॉडल आहे, त्यामुळे तिने जबाबदारीने वागायला हवे होते. नियम सर्वांसाठी समान आहेत.’
आलिया भट्ट दिल्लीला जात असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने बुधवारी आलियाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. आरोग्य विभागाने आलियाला सांगितले होते की, तू नियमांचे उल्लंघन केले आहेस, त्यामुळे तू दिल्लीत राहा, मुंबईत परत येऊ नकोस, जेणेकरून विषाणू अधिक लोकांमध्ये पसरू नये. पण यावेळीही आलिया राजी झाली नाही आणि रात्री उशिरा मुंबईत परतली. त्यामुळे आता या अभिनेत्रीवर साथीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सेलिब्रिटींमध्ये ज्या प्रकारे कोरोनाचा धोका वाढला आहे, त्यामुळे महापालिकाही चिंतेत आहे. अवघ्या दोन दिवसांत करीना कपूर, अमृता अरोरा, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि त्यांची मुलगी शनाया कपूर, सोहेले खानची पत्नी सीमा खान आणि त्यांचा धाकटा मुलगा योहान, सर्व 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
करिना कपूरसोबत बीएमसीने महीप कपूरचे घरही सील केले आहे. हे सर्व सेलिब्रिटी गेल्या आठवड्यात करण जोहरच्या घरी पार्टी करण्यासाठी पोहोचले होते. पाटीर्चे पाहुणे आणि सेलिब्रिटींचे कर्मचारी यांच्यासह 40 लोकांची चाचणी केली. करण जोहर आणि मलायका अरोरा यांचा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. करण जोहरच्या घराचीही स्वच्छता करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App