Chief Secretary of Bengal : निवडणुकांपासून सुरू असलेला ममतांचा केंद्राविरुद्धचा द्वेष अजूनही सुरू आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगाल गाठले, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आढावा बैठकीसाठी पंतप्रधानांना वाट पाहायला लावली. ममता बॅनर्जी या बैठकीला 30 मिनिटे उशिराने पोहोचल्या. Action on officer who made the PM wait, Center called Chief Secretary of Bengal back to Delhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणुकांपासून सुरू असलेला ममतांचा केंद्राविरुद्धचा द्वेष अजूनही सुरू आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगाल गाठले, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आढावा बैठकीसाठी पंतप्रधानांना वाट पाहायला लावली. ममता बॅनर्जी या बैठकीला 30 मिनिटे उशिराने पोहोचल्या.
माध्यमांतील वृत्तानुसार, बैठकीत शुभेंदू अधिकारी यांना बोलविण्यावर त्यांचा राग होता. ममता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून शुभेंदू यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत.
त्यांचे म्हणणे होते की, शुभेंदू अधिकारी जर बैठकीस येत असतील तर मी तेथे जाणे कठीण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता आणि मुख्य सचिव एकाच आवारात असूनही 30 मिनिटे उशिराने बैठकीसाठी पोहोचले. काल रात्री उशिरा केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांना परत बोलावले.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने हे आदेश दिले असून त्यांना तातडीने सोडण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. अलापन बंद्योपाध्याय यांना 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत डीओपीटी, दिल्लीला अहवाल देण्यास सांगितले आहे. ममता बॅनर्जी यांनी 24 मे रोजी म्हटले की, बंदोपाध्याय यांच्या कार्यकाळात तीन महिन्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. बंदोपाध्याय हे पश्चिम बंगाल केडरचे 1987च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
Action on officer who made the PM wait, Center called Chief Secretary of Bengal back to Delhi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App