केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठी खासदार कोटा रद्द पण सैन्य, पोलिसांसाठी नवीन कोटा सुरू!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने खासदार कोटा रद्द केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयांचे माजी कर्मचारी, खासदारांचे नातेवाईक, त्यांच्यावर अवलंबून असलेली नातवंडे या प्रकारचा कोटा देखील रद्द केला आहे. पण त्याच वेळी केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी सैन्यदले आणि पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बी आणि सी कॅटेगिरीत नवीन कोटा सुरू केला आहे. According to official data, during the year 2021-22, 7,301 students, including SC – 609, ST – 212, OBC – 1,811 and EWS – 55, were admitted through MP quotas across 1,248 KVs in India.

नवीन कोट्याचा लाभ सैन्य दलातील सीआरपीएफ बीएसएफ, सीआयएसएफ आयटीबीपी, एनडीआरएफ, आसाम रायफल्स अशा विशिष्ट तुकड्यांमधील सैनिकांना होणारा आहे. तसेच केंद्रीय पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील याचा लाभ होणार आहे. केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी खासदार कोटा रद्द करावा अथवा वाढवावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी, भाजप खासदार सुशीलकुमार मोदी आणि अन्य काही खासदारांनी केली होती.



त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेत खासदार कोटा रद्द करून तसेच केंद्रीय विद्यालय मॅनेजमेंटच्या कोटा शिक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठीचा कोटा रद्द करून सैन्य दलाच्या सेवेतील सीमेवरील कर्मचाऱ्यांच्या तसेच अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पोलिस दलातील सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी 50 चा नवीन कोटा निर्माण केला आहे. पीएम केअर योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची सध्या काळजी घेण्यात येते त्यांच्यासाठी देखील हा कोटा लाभदायक ठरणार आहे.

According to official data, during the year 2021-22, 7,301 students, including SC – 609, ST – 212, OBC – 1,811 and EWS – 55, were admitted through MP quotas across 1,248 KVs in India.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”