आम आदमी पक्ष आता उतरणार गोव्याच्या राजकीय आखाड्यात

विशेष प्रतिनिधी 

पणजी : गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्याचे पडघम आतापासूनच वाजण्यास सुरुवात झाली आहे. सत्तरुढ भाजपला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने आतापासूनच चयारी सुरु केली आहे.AAP will contest assembly election in Goa on its own

दिल्लीतील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या गोवा भेटी वाढू लागल्या आहेत. त्याची झलक आज पहायला मिळाली.२०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.पक्ष स्वबळावर सर्व ४० जागा लढविणार आहे, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. गोव्यात विरोधी पक्ष कमालीचा कमकुवत झाला असून तो भाजपला हवे तसेच वर्तन करत आहे.

त्यामुळे आम आदमी पक्ष भाजपला पर्याय ठरेल, असेही ते म्हणाले. गोवा दौऱ्यावर असलेल्या सिसोदिया यांनी माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर व मनोहर पर्रीकर यांनाही आदरांजली वाहिली. यामागेही मोठे राजकारण असल्याचे बोबले जाते.

कारण बांदोडकर व पर्रीकर दोन्ही मुख्यमंत्र्यांवर राज्यातील जनतेने प्रचंड प्रेम केले. त्यामुळे गोवन मतदारामध्ये पक्षाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न यानिमित्ताने केले जात आहेत.

AAP will contest assembly election in Goa on its own