लसीकरणातील दुजाभावाचा आरोप आकडेवारीनेच ठरविला खोटा, महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही ओलांडला एक कोटीचा टप्पा

महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थाननेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी दुपाारपर्यंत राजस्थानमधील एक कोटी लोकांना लास देण्यात आली हेती. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर लस पुरवठ्यात दुजाभाव केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, भाजपाविरोधी पक्ष सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत देशात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. Allegations of malpractice in vaccination are proved to be false by statistics only, after Maharashtra, Rajasthan has crossed the one crore mark


विशेष प्रतिनिधी 

मुंबई – महाराष्ट्रापाठोपाठ आता राजस्थाननेही कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी दुपाारपर्यंत राजस्थानमधील एक कोटी लोकांना लास देण्यात आली हेती. विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर लस पुरवठ्यात दुजाभाव केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, भाजपाविरोधी पक्ष सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत देशात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

राजस्थानचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी आरेग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. राजस्थानच्या जनतेने लसीकरणाच्या मोहीमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

शर्मा यांनी सांगितले की रविवारपर्यंत ९९ लाख ८३ हजार ४१८ लोकांचे लसीकरण झाले होते. सोमवारी हा आकडा एक कोटीपर्यंत गेला. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी एक एप्रिलपासून लसीकरण सुरू झाले. ३३८० सरकारी आणि १८८ खासगी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून दररोज सरासरी ४.७० लाख लोकांचे लसीकरण होत आहे. ५ एप्रिल रोजी ४.८४ लाख, ६ एप्रिल रोजी ५.८१, ७ एप्रिल रोजी ४.६५ लाख , ८ एप्रिल रोजी ४.२१ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले.राजस्थानला केंद्राकडून १ कोटी ११ लाख ४० हजार ८६० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस मिळाले आहेत. कॉँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रावर लसी पुरवठ्यात दुजाभाव केल्याचा आरोप केला जात होता. मात्र, भाजपाविरोधी पक्ष सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र आणि राजस्थामध्येच आत्तापर्यंत एक कोटींपेक्षा लसीकरण झाले आहेत. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा हे जास्त आहे.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असून, त्यांना गंभीर आजार आहेत अशा लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.

Allegations of malpractice in vaccination are proved to be false by statistics only, after Maharashtra, Rajasthan has crossed the one crore mark


महत्वाच्या बातम्या वाचा…