नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता पुन्हा एकदा पंजाब खुणावू लागले आहे. शेतकरी आंदोलनावरून धुमसणाऱ्या पंजाबमध्ये आपल्या पक्षाला मोठी संधी असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. राज्यात पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल आज पंजाबच्या भेटीवर जात आहेत.AAP will concentrate on Punjab
दिल्लीखालोखाल पंजाबमध्ये आपला नेहमीच मोठा पाठिंबा मिळत राहिला आहे. गेल्या आठवड्यात केजरीवाल यांनी गुजरातला भेट दिली होती. तेथे हार्धिक पटलेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. आता या जोडीला त्यांनी पंजाबवरही लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे.
केजरीवाल यांनी माजी पोलिस अधिकारी कुंवर विजयप्रताप सिंग यांना पंजाबात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याचे मनाशी ठरविले आहे. २०१५च्या कोटकपुरा पोलिस गोळीबारप्रकरणी चौकशी केलेल्या एसआयटी पथकात ते होते. पथकाचा अहवाल पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App