आप आमदारांचा रात्रभर विधानसभेत ठिय्या : नायब राज्यपाल सक्सेना यांच्या राजीनाम्याची मागणी; भाजपचेही विरोधात आंदोलन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजप एकमेकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आप आणि भाजपच्या आमदारांनी सोमवारी दिल्ली विधानसभेच्या आवारात रात्रभर ठिय्या मांडला. नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आप आमदारांनी दिल्ली विधानसभेत ठिय्या मांडला.AAP MLAs stay overnight in Legislative Assembly demand resignation of Lt. Governor Saxena; Protest against BJP too

आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी विधानसभेत नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले- एलजी 2016 मध्ये खादी आणि ग्रामोद्योग विभागाचे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी 1400 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्याचवेळी भाजप आमदारांनी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या मंत्र्यांना भ्रष्टाचारप्रकरणी बडतर्फ करण्याची मागणी केली.



पावसानंतरही दोन्ही पक्षांचे आमदार आपापल्या परीने विधानसभेच्या आवारात धरणे धरून बसले. ‘आप’च्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात बापूंच्या पुतळ्यासमोर तर भाजपच्या आमदारांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्यांसमोर ठिय्या मांडला.

केजरीवाल नौटंकी करत आहेत – बिधुरी

विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी म्हणाले- केजरीवाल आपल्या सरकारच्या दारू घोटाळ्यावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी विधानसभेचा राजकीय प्रचारासाठी वापर करत आहेत. दिल्ली विधानसभेच्या सोमवार आणि शुक्रवारी झालेल्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजात भाजपचे आठही आमदार उपस्थित नव्हते कारण त्यांना सभागृहाबाहेर फेकण्यात आले होते.

भाजपच्या आमदारांनी उपराज्यपाल व्ही के सक्सेनांचा बचाव केला आणि सांगितले की, आप नेते बदला घेण्यासाठी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत.

AAP MLAs stay overnight in Legislative Assembly demand resignation of Lt. Governor Saxena; Protest against BJP too

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात