#बॉयकॉट लालसिंग चढ्ढा मोहिमेचा मास्टर माईंड आमिर खानच; सिनेमा पडल्यावर भारताला म्हणेल असहिष्णू!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा लालसिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन या दोन सिनेमांवर बहिष्कार घालण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. यातल्या लालसिंग चढ्ढा बहिष्कारच्या मोहिमेबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिने परखड मत व्यक्त केले आहे.Aamir Khan is the mastermind behind the #Boycott Lal Singh Chadha campaign; India will be called intolerant after the release of the movie

#बॉयकॉट लालसिंग चढ्ढा या मोहिमेचा खरा मास्टर माइंड आमिर खानचा आहे, असा खळबळ जनक खुलासा कंगना राणावत हिने केला आहे. कंगनाने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहून आमिर खान आणि लालसिंग चढ्ढा पोलखोल केली आहे. गेल्या वर्षभरात कोणतीही हिंदी फिल्म चाललेली नाही. ज्या फिल्म चालल्या त्या सगळ्या दक्षिण भारतीय होत्या. त्यातही ज्यांनी भारतीय आणि लोकल फ्लेवर आणले त्या फिल्म चालल्या.या वातावरणात हॉलीवूडचा रिमेक चालणारच नाही याची पक्की जाणीव आमिर खानला आहे आणि त्यामुळेच त्याने धूर्तपणे #बॉयकॉट लालसिंग चढ्ढा मोहीम सोशल मीडियावर चालवली आहे. यातून सिनेमाचा थोडा तरी बोलावाला होईल, अशी त्याची अपेक्षा आहे आणि सिनेमा चालला नाही की भारत “असहिष्णू” आहे असे म्हणायला तो मोकळा आहे.

आमिर खानने आत्तापर्यंत पीके सारखा हिंदू फोबिक सिनेमा दिला आहे. तो सुपरहिट झाला तेव्हा आमिर खानला भारत असहिष्णू वाटला नव्हता. पण लालसिंग चढ्ढा फ्लॉप झाल्यावर मात्र आमिरला भारत असहिष्णू वाटायला लागेल, असा टोला कंगना राणावत यांनी लगावला आहे. कंगनाच्या या टोल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे

Aamir Khan is the mastermind behind the #Boycott Lal Singh Chadha campaign; India will be called intolerant after the release of the movie

महत्वाच्या बातम्या