विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्याची विधानसभा निवडणूक जसजशी रंगात येत आहे तस तसे राजकीय पक्षांचे वेगवेगळे फंडे पुढे येत आहेत. पक्षांतराच्या भीतीतून काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मंदिरे, मशिदी_ चर्चेस मध्ये नेऊन त्यांना गोव्यात विधानसभेत निवडून आलो तर पक्षांतर करणार नाही, अशी शपथ दिली आहे. तर त्यापुढे जाऊन आम आदमी पार्टीने गोव्यातल्या आपल्या उमेदवारांना शपथ तर दिली आहेच पण त्या पलिकडे सर्व उमेदवारांकडून आपण पक्षांतर करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी देखील घेतली आहे. Aam Aadmi Party’s next step in Congress; Signing of legal affidavit taken from candidates after swearing in !!
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोव्यात आम आदमी पार्टीने सर्व उमेदवारांना पक्षांतर न करण्याची शपथ दिली आणि त्यानंतर ताबडतोब कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर देखील त्यांची सही घेतली. गोव्यात चाळीस आमदारांची विधानसभा आहे. पण सर्व पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास उरलेला नाही. सर्वच पक्षांना पक्षांतराची मोठ्या प्रमाणावर भिति भेडसावत आहे. शिवाय सर्वच पक्ष एकमेकांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यात माहिर झाले आहेत. त्यामुळे असा उमेदवारांवर शपथविधीचा आणि प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्याचा “राजकीय प्रयोग” करण्यात येत आहे.
उमेदवारांकडुन कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर आज सह्या घेतल्याचीही माहिती आम आदमी पार्टीने दिली आहे. महालक्ष्मी मंदिर आणि बांबोळीम क्रॉस येथे हा आम आदमी पार्टीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यामुळे इतर पक्षांचे टेन्शन चांगलच वाढले आहे. निकालानंतर उमेदवार फुटण्याची विरोधी पक्षांना धास्ती लागली आहे. अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, तर काहीजण बंड करत अपक्ष लढण्याचा नारा देत आहेत.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बंड करत अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे, फक्त पर्रीकरच नाही तर काही जुन्या नेत्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशात काँग्रेसने सावध पवित्रा घेतलाय. कारण काँग्रेसने आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या थेट शपथा दिल्या आहेत. निवडणुकीनंतर होणारे पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना पक्षनिष्ठेची शपथ दिली आहे. शपथ घेताना निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App