उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार; आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची माहिती; पंधरा दिवसांत उमेदवारांची घोषणाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राजसभेचे खासदार संजय सिंह यांनी दिली. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये या निवडणुका होत आहेत.Aam Aadmi Party will contest all Assembly seats, MP Sanjay Singh’s; announcement of candidates in fifteen days

पंधरा दिवसात उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. तसेच भाजपचा खोट्या राष्ट्रवादाचा पर्दाफाश करणार असून आपचा राष्ट्रवाद खरा असल्याचे जनतेत बिंबविणार असल्याचे सिंह म्हणाले.आप हा ४३० विधानसभेच्या सर्व जागी उमेदवार उभे करणार असल्याचे सांगताना ते म्हणाले, आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार असून कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही. विशेष म्हणजे सिंह यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीची जबाबदारी आपने सोपविली आहे.

येत्या १५ दिवसात उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे ते म्हणाले. १२० उमेदवार पक्षाने निश्चित केले असून राज्यातील सर्व मतदार संघात खरा राष्ट्रवाद रुजविण्यासाठी तिरंगा यात्रा काढणार असल्याचे ते म्हणाले.

Aam Aadmi Party will contest all Assembly seats, MP Sanjay Singh’s;nnouncement of candidates in fifteen days

महत्त्वाच्या बातम्या