गुजरातमध्ये केजरीवाल यांच्यावर फेकली पाण्याची बाटली, गरबा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते दिल्लीचे मुख्यमंत्री


प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी गांधीधाम आणि जुनागडमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. या दौऱ्यात अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही गरबा कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी कोणीतरी केजरीवाल यांच्यावर बाटली फेकली.A water bottle was thrown at Kejriwal in Gujarat, the Delhi Chief Minister had come to participate in the Garba event

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजकोटमधील खोडलधाम गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते, त्यांनी नील सिटी क्लबच्या दांडिया कार्यक्रमात गरब्यातही सहभाग घेतला होता. अरविंद केजरीवाल खोडलधाम गरब्यात सहभागी होत असताना त्यांच्यावर कोणीतरी पाण्याची बाटली फेकली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, केजरीवाल यांच्यावर बाटली फेकणारी व्यक्ती कोण होती, हे समजू शकले नाही.आपल्या दौऱ्यात केजरीवाल यांनी दोन जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, गुजरातच्या जनतेला 27 वर्षे पर्याय नव्हता, पण यावेळी आम आदमी पार्टी हा पर्याय आहे आणि आता गुजरातमध्ये बदल होणार आहे. गुजरातची जनता 27 वर्षांपासून त्यांना सहन करत आहे. आता त्यांचा अहंकार मोडण्याची वेळ आली आहे.

भाजप-काँग्रेस आघाडीचा आरोप

सरकारी अहवालाचा संदर्भ देत केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये प्रचंड बहुमताने आपचे सरकार स्थापन होणार आहे. तेव्हापासून हे लोक वेडे झाले आहेत. त्यांनी चौफेर गुंडगिरी सुरू केली असून लोकांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. काहीही झाले तरी ‘आप’चे सरकार येऊ नये, यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू आहेत. ‘आप’चे सरकार आल्यास लूट थांबेल आणि सर्व पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी जाईल.

भगवंत मान यांचे भाजपवर टीकास्त्र

गुजरातमधील जुनागढ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या ‘अच्छे दिन’ घोषणेचा खरपूस समाचार घेत मान म्हणाले की, तुमचे अच्छे दिन आले की नाही माहीत नाही, पण डिसेंबरनंतर केजरीवालजींचे खरे दिवस येणार आहेत.

A water bottle was thrown at Kejriwal in Gujarat, the Delhi Chief Minister had come to participate in the Garba event

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी