स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची भेट : 28 सप्टेंबरला चंदीगड विमानतळाचे शहीद भगतसिंह विमानतळ नामकरण!!


वृत्तसंस्था

चंदीगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात केंद्र सरकारने देशाला एक अनोखी भेट दिली आहे. येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंह यांची जयंती आहे. याच दिवशी पंजाबची राजधानी चंदीगडच्या विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमात केली आहे.A visit to the Amrit Mahotsav of Independence: Chandigarh Airport to be renamed as Shaheed Bhagat Singh Airport on September 28!!

चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात केली आहे.– क्रांतिकारकांचा सन्मान

केंद्रातील भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने क्रांतिकारकांचा नेहमीच सन्मान केला आहे. कोलकत्ता विमानतळाचे नामकरण नेताजी सुभाष चंद्र बोस, तर अंदमान निकोबारच्या विमानतळाचे नामकरण वीर सावरकर विमानतळ असे दोन्ही याच सरकारच्या काळात घडले आहे. सुभाष बाबू आणि सावरकरांची नावे विमानतळांना देण्याचा निर्णय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात घेतला होता. तो त्याच वेळी अमलात आणण्यात आला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारने चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगतसिंग विमानतळ असे केले आहे.

A visit to the Amrit Mahotsav of Independence: Chandigarh Airport to be renamed as Shaheed Bhagat Singh Airport on September 28!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय