विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झाल्यावर आयोजित बीटिंग रिट्रीट सोहळ्यात एक हजार ड्रोननी आकाशात कसरती करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची झलक सादर केली. ते पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले तसेच तंत्रज्ञानाची किमया दिसली. एकाच वेळी १ हजार ड्रोन आकाशात उडत असल्याचे विलोभनीय दृश्य नागरिकांनी पहिले. A show of a thousand drones at the Beating Retreat ceremony
प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा झाल्यानंतर प्रथेप्रमाणे सैन्य दल बराकीत पाठविण्याचा सोहळा केला जातो. त्याला बीटिंग रिट्रीट , असे म्हंटले जाते. सोहळ्यात १००० ड्रोननी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साकारला.
प्रजासत्ताक दिनाची सांगता बीटिंग रिट्रीटने झाली. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. दिल्लीतील विजय चौकात सुरू असलेल्या बीटिंग रिट्रीटमध्ये सर्वात खास ड्रोन शोचे आयोजन ठरले.’ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे पहिल्यांदा वाजले. मात्र, यावेळी महात्मा गांधींच्या आवडत्या भजन ‘अबाइड विथ मी’ची धून ऐकू आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App