ए राजा यांचे मनुस्मृतिवर वादग्रस्त वक्तव्य : भाजपची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी- द्रमुक नेत्याला निवडणूक लढवण्यास बंदी घालावी


वृत्तसंस्था

चेन्नई : द्रमुक नेते ए. राजा यांनी मनुस्मृतीला शूद्र विरोधी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तामिळनाडू भाजपने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली. पक्षाने मागणी केली- ए. राजा यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी.A Raja’s Controversial Statement on Manusmriti BJP Demands Lok Sabha Speaker- Ban DMK Leader from Contesting Electionsविल्लुपुरममधील एका सरकारी कार्यक्रमात ए. राजा यांनी म्हटले होते की, मनुस्मृतीत शूद्रांचा अपमान करण्यात आला आणि त्यांना समानता, शिक्षण, रोजगार आणि मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. भाजपने म्हटले की, त्यांचे वक्तव्य एका समुदायाविरुद्ध द्वेष पसरवणारे आहे. लोकसभेतील कामकाजाच्या नियम 233A अन्वये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजा यांच्या वादग्रस्त विधानानंतर निलगिरीच्या उधगमंडलम, कुन्नूर, कोठागिरी आणि गुडालूर भागात अनेक दुकाने बंद करण्यात आली. खासगी बसेसनाही परवानगी देण्यात आली नाही. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 17 भाजप नेत्यांना ताब्यात घेतले आहे. एसपी आशिष रावत म्हणाले की, जबरदस्तीने दुकाने बंद करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

A Raja’s Controversial Statement on Manusmriti BJP Demands Lok Sabha Speaker- Ban DMK Leader from Contesting Elections

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय