विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ७९८ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल कौन्सिलने म्हटले आहे. यात सर्वाधिक दिल्लीत १२८ डॉक्टर मृत्युमुखी पडले तर बिहारमध्ये ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. 800 doctors died in second wave
कोरोना काळात भारतात ग्रामीण भाग, शहरी भागात डॉक्टर अहोरात्र सेवा देत आहेत. यादरम्यान कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरली आणि यात आजपर्यंत सुमारे ८०० डॉक्टरांचा जीव गेला. दिल्ली, बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ७९ डॉक्टरांचे निधन झाले. डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये अनुक्रमे २३ आणि २४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. पॉंडेचरीत मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. तेथे एक डॉक्टर कोरोनाने दगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App