केंद्रीय विद्यापीठात सहा हजार रिक्त जागा भरल्या मिशन मोडवर भरणार; शिक्षण मंत्र्यांचे कुलगुरूंना सूचना


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील केंद्रीय विद्यापीठात सहा हजार जागा रिक्त आहे. या जागा भरण्यासाठी कुलुगरूंनी मिशन मोडवर काम करण्याच्या सूचना मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्या आहेत. या जागा भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली असून त्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत जाहिरात देण्यासही सांगण्यात आले आहे.6,000 vacancies to be filled in Central University, HRD Minister instructs VC

देशातील ४५ राष्ट्रीय विद्यापीठांतील कुलगुरूंशी प्रधान यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय विद्यापीठांतील मंजूर पदांपैकी एक तृतियांश म्हणजे सहा हजार जागा रिक्त असल्याचे दिसून आले. त्यावर नाराजी व्यक्त करत प्रधान म्हणाले, आपण सर्व जण मिशन मोडवर काम करू.



शिक्षण पर्वाच्या (एज्युकेशन फेस्टिव्हल) दरम्यना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात रिक्त जागा भरण्याची मोहीम सुरू करू. काही विद्यापीठांमध्ये स्पष्टता नसेल परंतु सर्व संस्थांनी 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या रिक्त पदांची जाहिरात करावी.

यावेळी कुलगुरूंनी सांगितले की रिक्त जागांतील अनुशेष भरण्यासाठी लक्ष केंद्रीत केले आहे. जाहिरात देऊनही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेली रिक्त पदे भरलेली नाहीत.

६२२९ रिक्त जागांपैकी १७६७ ओबीसी प्रवगार्साठी, १०१२ अनुसूचित जातींसाठी आणि ६९२ अनुसूचित जातींसाठी होत.प्रधान म्हणाले, कोरोनाचा कहर कमी झाल्यावर विद्यापीठांनी शिक्षणासाठी दरवाजे पुन्हा उघडले पाहिजेत. त्यासाठी प्रत्यक्ष शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये क्रांतीकारी विचारसरणीची पेरणी होते. शिस्तीचे पालन करून संविधानाशी बांधिलकी निर्माण होते. लोकशाहीमध्ये हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे ज्ञानदानाच्या कार्यात कोणतीही तडजोड होणार नाही याकडे कुलगुरूंनी लक्ष द्यावे.

6,000 vacancies to be filled in Central University, HRD Minister instructs VC

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात