कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू; इंडियन मेडिकल असोसिएशनकडून माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य विषयक सेवा देणाऱ्यांना अहोरात्र कष्ट उपसले आहेत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली. 594 Doctors lost Their Life in Second Wave of Corona; Information from the Indian Medical Association

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत जूनपासून रुग्णसंख्या आता कमी होत चालली आहे. परंतु रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कोरोनाचे शिकार आले आहेत, असे आएमए मृत डॉक्टरांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


खबरदार डाॅक्टरांनो, राज्य सरकारविरुद्ध अपमानास्पद भाषेत टीका करू नका! पोलिसांची ‘आयएमए’ला सक्त ताकीद


देशातील मृतांमधील सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याचे माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले. आयएमएने राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला आहे. यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.
कोरोना महामारीत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं आयएमएने सांगितलं आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

594 Doctors lost Their Life in Second Wave of Corona; Information from the Indian Medical Association

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात