केरळमध्ये हिंसाचारानंतर पीएफआयच्या 500 जणांना अटक : एनआयएच्या छाप्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी तोडफोड; पोलिसांवर हल्ला, आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेक


वृत्तसंस्था

कोची : एनआयएने 15 राज्यांतील 93 ठिकाणी छापे टाकल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते हिंसक झाले. त्यांनी राजधानी तिरुअनंतपुरम आणि कोट्टायममध्ये अनेक सरकारी बस आणि वाहनांची तोडफोड केली.500 PFI arrested after violence in Kerala Many places vandalized to protest NIA raid; Attack on police, bomb thrown at RSS office

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कन्नूरमधील मत्तनूर येथील आरएसएसच्या कार्यालयावरही पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटरसायकलवरून आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांनी कोल्लममध्ये दोन पोलिसांवरही हल्ला केला. एडीजीपी, कायदा आणि सुव्यवस्था, विजय साखरे यांनी सांगितले की, हिंसाचारानंतर पोलिसांनी 500 लोकांना अटक केली आणि 400 लोकांना ताब्यात घेतले.



केरळ उच्च न्यायालयाने म्हटले- अटकेनंतर अशी निदर्शने करणे योग्य नाही . केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगीशिवाय कोणीही बंदचे आवाहन करू शकत नाही. अटकेनंतर असे प्रदर्शन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

काँग्रेसने रोखली भारत जोडो यात्रा

काँग्रेसने शुक्रवारी भारत जोडो यात्रा रोखली. पीएफआय आणि इस्लामिक जिहादी संघटनांनी आज संप पुकारला आणि काँग्रेसने आज आपली पदयात्रा थांबवली याचा भाजपने खरपूस समाचार घेतला. यापेक्षा वाईट आणि लज्जास्पद काहीही असू शकत नाही.

500 PFI arrested after violence in Kerala Many places vandalized to protest NIA raid; Attack on police, bomb thrown at RSS office

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात