कोरोनाच्या तडाख्याचा पोलिस दलाला मोठा फटका, आतापर्यंत ४६९ जणांचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

मुंबई – करोनाच्या साथीत समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना जसा फटका बसला आहे तसाच त पोलिस दलालाही बसला आहे. कोरोनाच्या साथीत गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत तब्बल ४६९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिस दलात आतापर्यंत सर्वाधिक आठ हजार ८८६ पोलिस पॉझिटिव्ह होते, त्यातील ११९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 469 police died due to corona

दरम्यान पोलिस दलाच्या लसीकरणाने वेग घेतला आहे. राज्य पोलिस दलातील एक लाख ५४ हजार पोलिसांपैकी एक लाख ३४ हजार पोलिसांना पहिला डोस तर एक लाख चार हजार पोलिसांना लशीचे दोन्ही डोस दिले आहेत. मुंबई पोलिस दलातील ४५ हजारपैकी ३८ हजार पोलिसांनी कोरोनाची पहिली लस घेतली. तर २८ हजार ८०० पोलिसांना दोन्ही लशीचे डोस देण्यात आले. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या वर्षी एप्रिलमध्ये ६८, तर मेमध्ये ४७ पोलिसांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५५, सप्टेंबरमध्ये ८७ पोलिसांचा मृत्यू झाला होता. सध्या मृत्युमध्ये घट ही स्थिती दिलासादायक असली ४७ ही संख्याही मोठी आहे. यावर्षी दुसऱ्या लाटेत सुमारे सहा हजार पोलिसांना लागण झाली. तुलनेने मेमध्ये ही संख्याही घटली असून, दोन हजार ९३४ पोलिसांना लागण झाली.

469 police died due to corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण