विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत सुमार 42 लाख अपात्र शेतकऱ्यांना तीन हजार ककोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली. त्यांच्याकडून या रकमेची वसुली सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.3,000 crore allotment to 42 lakh ineligible farmers under PM Kisan Sanman Yojana, Union Agriculture Minister said
तोमर म्हणाले, केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान अनेक लाभार्थ्यांनी पात्र नसतानाही पीएम किसान योजनेचा फायदा घेतला आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेशन गाईडलाइन्स’ (एसओपी) जारी केले गेले आहेत आणि राज्यांना पाठविले गेले आहेत.
आधार, पीएफएमएस किंवा आयकर डेटाबेस सारख्या विविध प्राधिकरणाद्वारे लाभार्थ्यांच्या डेटाची सत्यता तपासण्यात त्रुटींवर तोडगा काढण्यात आला आहे. तथापि, पडताळणी प्रक्रियेदरम्यान असे आढळले की आयकर भरणाऱ्यांनाही या योजनेचा फायदा मिळाला आहे.
अपात्र शेतकºयांच्या यादीत आसाम अव्वल आहे, त्यानंतर तामिळनाडू, पंजाब आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. आसाममध्ये जवळपास ८.३५ लाख शेतकरी अपात्र आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये ७.२२ लाख लाभार्थी बनावट आहेत.
पंजाबमध्ये ५,६५ लाख, महाराष्ट्रात ४.४५ लाख आणि गुजरातमध्ये २.३६ लाख अपात्र लाभार्थी आढळले आहेत.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे. छोट्या शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्तयात सहा हजार रुपये दिले जातात. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकरी कुटुंबांची निवड करते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App