कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर


वृत्तसंस्था

पाटण : कोयनेसह सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी झालेला भूकंप ह ३.९ रिश्टर स्केलचा होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी हा भूकंप झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. 3.9 magnitude earthquake shakes Koyna area; center point is 28 km away from dam



भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला बारा किलोमीटर अंतरावर होता. कोयना धरणापासून केंद्रबिंदूचे अंतर २८ किलोमीटर आहे .भूकंपाची खोली १५ किलोमीटर अंतरावर होती. हा भूकंप कोयना ,पाटण, कराड, चिपळूण, पोफळी आदी सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात जाणविला.. या भूकंपामध्ये वित्तहानी झाली नसून कोयना धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

3.9 magnitude earthquake shakes Koyna area; center point is 28 km away from dam

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!