पाच वर्षात बिहार मध्ये सर्वाधिक, ७२१, महाराष्ट्रात २९५ दंगली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मागील पाच वर्षात दंगलीचे सर्वाधिक ७२१ गुन्हे बिहार, ५२१ दिल्ली ४२१ हरियाणा आणि २९५ प्रकरणे महाराष्ट्रात नोंदवले गेले. यात अटकेतील आरोपींची संख्याही वाढली आहे. सन २०२० मध्ये देशात दंगलीची एकूण प्रकरणे ८५७ होती. यात दिल्लीतच ५२० (सुमारे ६१ टक्के) गुन्हे दाखल झाले. 295 riots in Maharashtra in five years

देशात जातीय दंगलीच्या गुन्ह्यांत घट होत आहे. आता पूर्वीच्या तुलनेत जास्त संख्येने दंगलखोरांना न्यायालयाने शिक्षा केली आहे. दंगलीत सहभागी लोकांना तीन ते चार वर्षापूर्वी दीड ते तीन टक्के लोकांना शिक्षा होत होती. आता ही संख्या वाढून १० टक्क्यांवर गेली आहे.

देशात मागील ५ वर्षांत ३,३९९ दंगली झाल्या होत्या. दंगलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. जर दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात या वर्षात दंगली झाल्या नसत्या तर पाच वर्षात देशातील सर्वात कमी दंगलीचा विक्रम नोंदला गेला असता.

सन २०२० मध्ये उत्तर प्रदेशशिवाय उत्तराखंड, छत्तीसगड, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरासह काही केंद्रशासित प्रदेशात दंगलीची एकही घटना नोंद नाही. मागील पाच वर्षात केंद्रशासित प्रदेशात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरशिवाय कोणत्याही केंद्रशासित प्रदेशात दंगल उसळली नाही.

२०१९ मध्ये सर्वाधिक ३३२ जणांना शिक्षा

शिक्षेचे प्रमाणही वाढले आहे. सन २०१६ मध्ये दंगल प्रकरणात अटकेतील लोकांपैकी १.४२%, २०१७ मध्ये २.४४%, २०१८ मध्ये ४.०८%, २०१९ मध्ये १३.८०% आणि २०२० मध्ये अटकेतील लोकांपैकी ११.१० दोषींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

295 riots in Maharashtra in five years

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण