27 ऑक्टोबर 1947; काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरवले!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : आजच्याच दिवशी म्हणजे 27 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर वाचवण्यासाठी भारतीय सैन्य श्रीनगर मध्ये उतरवले. आज हा ऐतिहासिक दिन आहे. या दिवसाला भारतीय सैन्याचा पायदळ दिवस म्हणून ओळखले जाते.27 October 1947; Indian Army landed in Srinagar to save Kashmir

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने कबालींच्या रूपात आपले सैन्य जेव्हा काश्मीर कब्जा लिहिण्यासाठी उतरवले, त्यावेळी महाराजा हरिसिंग यांनी भारतातील सैन्यदलाची मदत मागितली. काश्मीर मधली परिस्थिती प्रचंड चिघळलेली पाहून भारतीय सरकारने काश्मीर मध्ये विमानातून सैन्यदले उतरवण्याचा निर्णय घेतला.आजच्या दिवशी सकाळी रॉयल इंडियन एअरफोर्सच्या डाकोटा विमाने भारतीय सैन्य आणि सामग्री श्रीनगर विमानतळावर उतरवले आणि तेथूनच काश्मीरमधून पाकिस्तान यांना सैन्याला उखडण्याची जबरदस्त मोहीम सुरु झाली. या मोहिमेला यश येऊन काश्मीर मुक्त करण्यात आले.

ज्या डाकोटा 12 विमानातून भारतीय सैन्य दलाला श्रीनगर विमानतळावर उतरवण्यात आले त्या डाकोटा स्क्वार्डन मधील डाकोटा vp905 हे विमान इंडियन एअरफोर्सने भारतीय हवाई दलाला भेट दिले. त्याचे नाव “परशुराम” असे ठेवण्यात आले. सध्या ते भारतीय हवाई दलाच्या विंटेज कलेक्शन मध्ये समाविष्ट आहे आणि अजूनही त्याचे उड्डाण करता येते.

महाराजा हरिसिंग यांनी कायदेशीर दस्तऐवजांवर स्वाक्षर्‍या करीत आधीच जम्मू – काश्मीर ही रियासत भारतात सामील केली होती. या सैन्य कारवाईनंतर जम्मू-काश्मीर भारत असे एक राज्य म्हणून भारतीय संघराज्यात समाविष्ट झाले. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचे प्रतिक म्हणून आजचा दिवस भारतीय पायदळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

27 October 1947; Indian Army landed in Srinagar to save Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती