वृत्तसंस्था
रायपुर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए आणि तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या वादात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उडी घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधातला चेहरा अर्थात नेतृत्व युपीएचे नेते संयुक्तरीत्या ठरवतील, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.2024 loksabha elections, UPA face Will be decided collectively, says bhupesh baghel
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या पोर्च मधून यूपीएच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व ठामपणे उभे राहून भाजपशी लढत नाही, असाही आरोप केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे.
छत्तीसगड सरकारनेही स्वस्त केले पेट्रोल आणि डिझेल, मुख्यमंत्री बघेल यांची घोषणा – पेट्रोलवर 1% आणि डिझेलवर 2% व्हॅट कमी
या राजकीय वादात भूपेश बघेल यांनी उडी घेतली आहे. भूपेश बघेल म्हणाले, की ममता बॅनर्जी यांनी हे ठरवावे की त्यांना खरंच भाजपशी लढायचे आहे?, की विरोधी पक्षांशी लढून तृणमूल काँग्रेसला मुख्य विरोधी पक्ष बनवायचे आहे? यूपीएचे नेतृत्व ममता बॅनर्जी ठरवू शकत नाहीत. कारण त्या यूपीएमध्ये नाहीत. भाजप विरोधातला 2024 च्या लोकसभा निवडणुकीतला चेहरा म्हणजे नेतृत्व हे यूपीए सर्व नेते एकत्र येऊन संयुक्तरित्या ठरवतील आणि त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यास येतील. ममता बॅनर्जी या केवळ विरोधकांमध्ये फूट पाडून स्वतःची तृणमूल काँग्रेस बळकट करू शकत नाहीत या राजकीय वास्तवाची जाणीव त्यांना नाही का?, असा परखड सवाल बघेल यांनी केला आहे.
भूपेश बघेल हे सध्या उत्तर प्रदेश राज्याचे प्रभारी देखील आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेशाची विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी काँग्रेस नेतृत्वाला अनुकूल ठरेल, असे वक्तव्य करून आपले वजन नेतृत्वाच्या पारड्यात टाकले आहे. परंतु त्याच वेळी युपीएचे नेते संयुक्तरीत्या 2024 चेहरा ठरवतील म्हणजे नेतृत्व कोणी करायचे हे ठरवतील, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केल्याने याचा अर्थ राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे का?, असाही घेण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App