2022 हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल; हा तर गांधी मुक्त काँग्रेसचा विजय!


विशेष प्रतिनिधी

शिमला : गुजरात मध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजयाचा डंका वाजला असला तरी हिमाचल प्रदेशात काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता मिळविली आहे. तशीही हिमाचल प्रदेशात आलटून पालटून काँग्रेस आणि भाजप यांचीच सत्ता येत असते. त्याची पुनरावृत्ती 2022 च्या हिमाचल प्रदेश निवडणुकीत झाली आहे. पण या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर तो गांधीमुक्त काँग्रेसचा विजय मानावा लागेल. Himachal Pradesh Elections 2022 : its it’s a “Gandhi free” Congress victory

गुजरात असो वा हिमाचल प्रदेश असो दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या गांधी परिवारांमधील प्रियांका गांधींचा अपवाद वगळता सोनिया आणि राहुल गांधी फिरकले देखील नाहीत. राहुल गांधींच्या गुजरात मध्ये फक्त दोन सभा झाल्या आणि ते पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेत सामील झाले. राहुल गांधींनी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही निवडणुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. दोन्ही राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांनीच संघटनात्मक बळाच्या जोरावर निवडणुका लढवल्या होत्या. प्रियांका गांधी हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी प्रचाराला गेल्या.

पण उत्तर प्रदेशात जशी त्यांनी काँग्रेसची कमान सांभाळली होती, तशी अवस्था निश्चितच गुजरात अथवा हिमाचल प्रदेशात नव्हती. 2019 ची निवडणूक जशी गांधी परिवाराने प्रत्यक्ष पुढाकार घेऊन लढवून दाखवली तशी निवडणूक गुजरात आणि हिमाचलमध्ये त्यांनी लढवली नाही. त्यामुळे अर्थातच गुजरातच्या पराभवाचे खापर कोणी गांधी परिवारावर फोडलेले नाही. तसेच हिमाचल मधल्या विजयाचे श्रेय देखील खुद्द काँग्रेस मधूनच फारसे कोणी गांधी परिवाराला दिलेले दिसत नाही. काँग्रेसचे एक प्रवक्ते प्रमोद कृष्ण यांनी तर हिमाचल प्रदेशात दलित आणि पिछड्या वर्गाची मते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामुळे काँग्रेसच्या पारड्यात आली, असे वक्तव्य केले आहे. कै. वीरभद्र सिंह यांच्या नावावर हिमाचलमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवली होती हे कोणी नाकारू शकत नाही, असे तिथल्या काही स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

याचा अर्थ हिमाचल मधला प्रदेश एक प्रकारे गांधी मुक्त काँग्रेसचा म्हणजेच काँग्रेस संघटनेचा विजय मानला पाहिजे. मग भले तिथे रोटेशन पद्धतीने सत्तांतर होत राहो. सत्ता मिळवण्यासाठी आणि ती राबवण्यासाठी विशिष्ट बळाचे संघटन लागते ते संघटन काँग्रेसने हिमाचल प्रदेशात निर्माण केले आहे हे मान्य करावे लागेल. अर्थात हिमाचल प्रदेश मधला काँग्रेस संघटनेच्या बळावरचा विजय हा एक प्रकारे गांधी परिवाराच्या नेतृत्वासाठी धोकाही ठरू शकतो. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने स्वतःला अबाऊ ऑल असे नेतृत्व म्हणून एस्टॅब्लिश करू इच्छित आहेत. प्रमोद कृष्णन यांनी तर त्यांची तुलना महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्याशी करून ते पक्ष संघटनेत अथवा निवडणुकीत नसल्याचे स्पष्ट सांगितले असते आहे. याचा अर्थ आता राहुल गांधी तूर्त तरी काँग्रेसच्या संघटनेत लक्ष घालत नाहीत असा घ्यावा लागेल. पण तरी देखील जर हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय होत असेल तर त्याचा अर्थ तो गांधीमुक्त काँग्रेसचा विजय आहे असेही मान्य करावे लागेल. मग हे काँग्रेस मधल्या गांधी परिवाराला मान्य आहे का?? तसे मान्य केल्यास गांधी परिवार सोडूनही काँग्रेस चालू शकते आणि काँग्रेसला संघटनेच्या बळावर विजय मिळू शकतो, हे गांधी परिवार स्वीकारणार आहे का?? हे प्रश्न हिमाचल मधल्या काँग्रेस विजयाने निर्माण केले आहेत.

आमदार फुटण्याची काँग्रेसला भीती

काँग्रेसने तिथे बहुमत मिळवले असले तरी तिथले आमदार फुटू नये यासाठी त्यांना चार्टर्ड प्लेनने रायपूरला नेण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. यातून काँग्रेसचे नेते जसा भाजपच्या फाटाफुटीच्या राजकारणावर संशय निर्माण करू इच्छितात, त्याचबरोबर ते आपले नेते फुटू शकतात हे सुप्तपणे कबूल करतात, हा विरोधाभास इथे लक्षात घेतला पाहिजे. किंबहुना गांधी मुक्त काँग्रेसचा हिमाचल मधला विजय या पक्षाचे नेते कितपत पचवू शकतील??, असे प्रश्नचिन्ह खुद्द काँग्रेस नेत्यांनीच आपल्या राजकीय कृतीतून निर्माण केले आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

Himachal Pradesh Elections 2022 : its it’s a “Gandhi free” Congress victory

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात