Mundka Fire : 2 क्रेन चालक ठरले 50 महिलांना आगीतून वाचवणारे देवदूत!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंदका येथे लागलेल्या आगीत 27 दुर्दैवी जिवांना आपले प्राण गमवावे लागले असले तरी दोन क्रेन चालक मात्र 50 महिलांना आगीतून वाचवणारे देवदूत ठरले आहेत!! 2 crane drivers become angels to save 50 women from fire !!

अनिल तिवारी आणि दयानंद तिवारी अशी या दोन क्रेन चालकांची नावे असून आग लागल्याच्या दिवशी दुपारी बरोबर 4.00 वाजता ते त्याच ठिकाणाहून क्रेनमधून निघाले होते. आग लागल्याची पहिली माहिती त्यांना समजली. त्यांनी ताबडतोब बचावासाठी क्रेन मार्फत डिव्हायडर तोडले. इमारतीच्या काचा फोडल्या आणि क्रेनच्या पट्ट्यांवरून महिलांना उतरविण्याचे काम सुरू केले. जास्तीत जास्त वेगात या दोघांनी काम केले. त्यामुळे 50 महिलांचा जीव वाचू शकला.

क्रेनने इमारतीच्या शक्य तेवढ्या काचा फोडल्याने आगीच्या धुरात गुदमरणारे जीव वाचले, असे अनिल तिवारी आणि दयानंद तिवारी यांनी सांगितले. आगीच्या ठिकाणी त्यावेळी प्रचंड धूर होता आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचायच्या होत्या. त्या आधी या दोघांनीही शक्य तितक्या वेगाने काम करून महिलांचा जीव वाचवला. परंतु आपण आणखी जीव वाचवू शकलो नाही, अशीच खंत या दोघांनी व्यक्त केली आहे.

क्रेन मालक सुधीर कुमार यांनी देखील या मदतीमध्ये सहभागी होऊन संबंधित महिलांना सुरक्षित पोचवण्यासाठी स्थानिक लोकांच्या गाड्यांचा वापर केला. आगीची भीषणता वाढत असताना यांनी काम थांबवले नाही. शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यामुळेच 50 महिलांचे जीव वाचू शकले. हे क्रेनचालक खऱ्या अर्थाने या महिलांसाठी देवदूत ठरले.

2 crane drivers become angels to save 50 women from fire !!

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात