विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेतील नवा विक्रम आज भारताने केला. देशात ३१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी जवळपास 1,30,84,344 पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडावीया यांनी ट्वीट करत दिली आहे.1,30,84,344 New record of vaccination in the country, vaccination of people on the same day
भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आज 1.09 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यानी ट्वीट करत देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.
यापूर्वी एक कोटी लसीकरणाचा विक्रम झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ट्वीट करून देशवासियांना माहिती दिली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात सर्वाधिक लसीकरण झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App