वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनातून बरे झाल्यावर माणूस निर्धास्त होतो. परंतु सावध व्हा ! कारण कधीकधी आरटोपीसीआरमध्ये (RT-PCR) कोरोना चकवा देत असल्याने व्यक्ती पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्ह येते. टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे माणूस निर्धास्त होतो. पण, त्या नंतर कोरोनामुक्त व्यक्तीने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शिवाय आणखी तीन टेस्ट करून घ्याव्यात, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. कोरोनाने तुमच्या शरीराचे किती नुकसान केले आहे? याची माहिती तुम्हाला याद्वारे मिळणार आहे. Don’t be complacent after recovering from a corona, only three tests are necessary; Expert advice
1) अँटीबॉडी टेस्ट
कोरोनामुळे शरीराच्या अवयवांचे नुकसान होते. विशेषत: फुफ्फुसांवर आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर विषाणू हल्ला करतो. यासाठी अँटीबॉडी टेस्ट करणे महत्वाचे आहे. अँटीबॉडीजची स्थिती काय आहे, हे या टेस्टद्वारे माहीत होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही टेस्ट करावी.
2) सीबीसी टेस्ट
सीबीसी टेस्ट म्हणजे कंम्प्लीट ब्लड काऊंट टेस्ट, शरीरातील पेशींची तपासणी केली जाते. कोरोना संसर्गाविरूद्ध त्याचे शरीर कशी प्रतिक्रिया देते, याचा अंदाज येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही चाचणी खूप महत्वाची आहे.
3 ) शुगर टेस्ट
शुगर आणि कोलेस्ट्रोल टेस्ट महत्वाची आहे. शुगर असलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. कोरोनादरम्यान बर्याच वेळा लोकांच्या शरीरात शुगरची पातळी वाढते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्ट देखील करण्यास सांगितले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App