उत्तर प्रदेशातील गाेळीबाराच्या घटनेनंतर एआयएमआ यएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैदी यांना तातडीने झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पाेलीस बलातर्फे ( CRPF) ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे गोळीबार झाला हाेता.Z c to Asuddin Owaisi after the firing incident
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील गाेळीबाराच्या घटनेनंतर एआयएमआ यएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैदी यांना तातडीने झेड सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पाेलीस बलातर्फे ( CRPF) ही सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे गोळीबार झाला हाेता.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रचार आटोपून ओवेसी दिल्लीला परतत असताना ही घटना घडली हाेती. ओवेसी यांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग 24 च्या हापूर-गाझियाबाद मार्गावरील छिजारसी टोल प्लाझाजवळ होता. त्यावेळी ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
ओवेसी म्हणाले, आम्ही टोल गेटवर होतो आणि अचानक तीन ते चार गोळ्यांच्या गोळ्या ऐकू आल्याने आम्ही वेग कमी केला. माझ्या कारलाही काही डेंट्स आले आणि एक टायर पंक्चर झाला. निवडणूक आयोगाला (EC) घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती करत आहे.
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.स्थानिक हापूर पोलिसांनी सांगितले की, मेरठ झोनचे महानिरीक्षक तपासासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App